शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोड तालुक्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण

By admin | Updated: July 28, 2014 01:04 IST

राजू वैष्णव, सिल्लोड सिल्लोड तालुक्यात दीड महिना उशिरा पावसाचे आगमन झाल्याने कपाशीचे क्षेत्र कमी होऊन मका, बाजरी, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली.

राजू वैष्णव, सिल्लोडसिल्लोड तालुक्यात दीड महिना उशिरा पावसाचे आगमन झाल्याने कपाशीचे क्षेत्र कमी होऊन मका, बाजरी, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली. तालुक्यात ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून, दमदार पाऊस झाला नसल्याने जलसाठे कोरडेच आहे. शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दीड महिना उशिरा पेरण्या झाल्या. यंदा तालुक्यात तीन टप्प्यांत पेरणी झाली. निल्लोड, कायगाव, पिंपळगाव पेठ,भवन, बोरगाव कासारी या परिसरात जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी केली. यानंतर घाटनांद्रा, गोळेगाव, उंडणगाव, आमठाणा, अजिंठा, शिवना या परिसरात पाऊस झाला. अंधारी, भराडी, बोरगाव बाजार, पळशी, वांगी, मोढा या परिसरात जुलैच्या तिसऱ्या आठवड्यात पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांनी यंदा धुळपेरणी के ली होती. मध्यम व हलक्या स्वरूपाच्या पावसावर बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशी, मका, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली. यानंतर दोन-तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. तीन-चार दिवसांपूर्वी तालुक्यात सलग दोन दिवस रिमझिम पाऊस झाल्याने जमिनीत खोलवर ओल गेल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तालुक्यात ९७ हजार हेक्टर जमीन आहे. यापैकी ९१ हजार हेक्टर क्षेत्रात पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. कपाशी, मकाच्या उत्पन्नात सिल्लोड तालुका जिल्ह्यात अग्रेसर आहे. परंतु यंदा दीड महिना पावसाचे उशिरा आगमन झाल्याने कपाशीचे क्षेत्र कमी होऊन मका, बाजरी, सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. तालुक्यात कपाशी, मका ही दोन पिके प्रामुख्याने घेतली जातात; परंतु यंदा अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली. तालुक्यातील शेतकरी सोयाबीन पिकाकडे आकर्षित होत आहे. पूर्वहंगामी कपाशीची लागवडगेल्यावर्षी तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याने नदी, नाले, खळखळून वाहत होते. यामुळे बहुतांश जलसाठे ओव्हरफ्लो झाले होते. मार्च महिन्यात तालुक्यात मोठ्या प्रमाणात गारपिटीसह पाऊस झाल्याने विहिरींना मुबलक प्रमाणात पाणी होते. यामुळे यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पूर्वहंगामी कपाशीची लागवड केली. तालुक्यात ८ हजार हेक्टर जमिनीत शेतकऱ्यांनी पूर्वहंगामी कपाशीची लागवड केलेली आहे. २२ गावांना टँकरने पाणीपुरवठातालुक्यात दीड महिना उशिरा पावसाचे आगमन होऊनही अद्यापपर्यंत दमदार पाऊस झाला नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. तालुक्यातील अंधारी, पळशी, पिंपळदरी वाडा, पिंपळदरी, अनाड, मुखपाट, गेवराई सेमी, दीडगाव, पिंप्री,जळकी घाट, केऱ्हाळा, डोंगरगाव, वडाळा, वरुड, पिरोळा-डोईफोडा, धावडा, रेलगाव वाडी, बोरगाव सारवणी, धानोरा, डकला या गावांना ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी दमदार पावसाची गरज आहे.