शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
2
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
3
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
4
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
5
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
6
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
7
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
8
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
9
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
10
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
11
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
12
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
13
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
14
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
15
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
16
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
17
आयएएस तुकाराम मुंढे आता ‘अन्न व औषधी प्रशासन’च्या आयुक्तपदी, २१ वर्षांत २५ वी बदली; आणखी तीन बदल्या
18
मोटेगावकरच्या मुलाचीही सीबीआय चौकशी; विदर्भातील ३ उमेदवारांच्या घराची झाडाझडती
19
महाराष्ट्राचे अणुऊर्जा निर्मिती क्षेत्रात मोठे पाऊल, साडेसहा लाख कोटींची गुंतवणूक
20
भोंदू खरातला ‘ईडी’कडून अटक; कोट्यवधींचे मायाजाल उलगडणार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने  छत्रपती संभाजीनगर नामकरण समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम

By बापू सोळुंके | Updated: March 4, 2023 13:20 IST

खासदार इम्तियाज जलील यांचे आंदोलन जनतेविरोधात असल्याचा आरोप मनसेने केला. 

छत्रपती संभाजीनगर:  एमआयएम नेते खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर नामकरण  करण्याचा निर्णयाविरोधात   आंदोलन सुरू केले. खा. जलील यांच्या विरोधात आणि छत्रपती संभाजीनगर नामकरणाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज टीव्ही सेंटर येथे स्वाक्षरी अभियान राबविले. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झाले. 

छत्रपती संभाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी ,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विजय असो, आदी घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्या. यावेळी बोलताना खांबेकर  म्हणाले की, छत्रपती संभाजीनगर असे या शहराचे नामकरण व्हावे, अशी  मनोमन इच्छा सामान्य नागरिकांची होती, केंद्र सरकार आणि राज्य सरकारने सामान्य नागरिकांचे मन ओळखून शहराचे नामकरण केले. असे असताना खासदार इम्तियाज जलील मात्र जनतेविरुद्ध आंदोलन करीत असल्याचे दिसते. जलील यांचा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाला विरोध का आहे ?हे त्यांनी स्पष्ट करावे.  औरंगजेबाचे नाव त्यांना खूपच प्रिय असेल तर त्यांनी त्यांच्या मुलांचे नावे औरंगजेब ठेवावे, त्यास आमच्या विरोध नाही, मात्र छत्रपती संभाजी नगर या नावाला विरोध कराल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना खासदार जलील  यांच्याविरुद्ध यापुढेही आंदोलन करील ,असा इशारा त्यांनी दिला.

या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, आशिष सुरडकर, बिपीन नाईक, संकेत शेटे राहुल पाटील, मनीष जोगदंडे, रामकृष्ण मोरे, प्रशांत दहिवाडकर ,सागर राजपूत ,सपना ढगे, अनिता लोमटे, महेश डोंगरे, मोनू तुसे, , राजेश रावळकर,किशोर गू ळे, प्रशांत इंगळे अनिता लोमटे सपना ढगे आदींनी सहभाग नोंदविला.

टॅग्स :MNSमनसेAurangabadऔरंगाबादImtiaz Jalilइम्तियाज जलील