वैजापुरात शॉर्ट सर्किटने दीड एकर ऊस जळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 17:08 IST2018-10-27T17:06:29+5:302018-10-27T17:08:42+5:30
तालुक्यातील नगिना पिंपळगांव येथे झालेल्या या घटनेत शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे.

वैजापुरात शॉर्ट सर्किटने दीड एकर ऊस जळाला
वैजापुर (औरंगाबाद ) : विजेच्या तारांमध्ये झालेल्या घर्षणाने लागलेल्या आगीत सुमारे दिड एकर क्षेत्रावरील ऊस जळाल्याची घटना आज दुपारी घडली. तालुक्यातील नगिना पिंपळगांव येथे झालेल्या या घटनेत शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, येथील विजय एकनाथ गायकवाड यांची पिंपळगांव येथे गट क्र १७ मध्ये शेत जमीन आहे. या ठिकाणी त्यांनी दिड एकर क्षेत्रात उसाची लागवड केली होती.शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक विजेच्या तारांमध्ये घर्षण होवून उसात ठिणग्या पडून आग लागली. दुपारी उन्हाच्या तीव्रतेमुळे आगीने पाहता पाहता चांगलाच पेट घेतला. शेजारच्या शेतात काम करणारे शेतकरी यांनी तत्काळ या घटनेची माहिती देताच परिसरातील लोकांनी शेतात धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र तोपर्यंत या आगीत दिड एकर क्षेत्रावरील उस जळून खाक होवून लाखो रुपयांचे नुकसान झाले.