धक्कादायक ! पतीसमोरच गळफास घेऊन पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 11:47 IST2020-01-07T11:45:32+5:302020-01-07T11:47:05+5:30

विवाहितेच्या पश्चात साडेतीन वर्षांची एक आणि केवळ चार महिन्यांची दुसरी मुलगी आहे. 

Shocking! Wife commits suicide by hanging in front of husband | धक्कादायक ! पतीसमोरच गळफास घेऊन पत्नीची आत्महत्या

धक्कादायक ! पतीसमोरच गळफास घेऊन पत्नीची आत्महत्या

ठळक मुद्देदोघांनी सोबतच गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

औरंगाबाद : भगतसिंगनगर भागात २२ वर्षीय माया आकाश सुरडकर (२२) या विवाहितेचे पतीसमोर गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविली. विवाहितेच्या पश्चात साडेतीन वर्षांची एक आणि केवळ चार महिन्यांची दुसरी मुलगी आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील मायाचा आकाश सुरडकर याच्यासोबत पाच वर्षांपूर्वी विवाह झाला होता. आकाश हा फायनान्स कंपनीत वसुलीचे काम करतो. मायाच्या चारित्र्यावर तो संशय घ्यायचा. त्यातून कुटुंबात नेहमी वाद होत असत. रविवारी रात्री या दोघांत पुन्हा वाद झाला. दोघांनी सोबतच गळफास घेण्याचा प्रयत्न केला. खुर्ची ठेवून सिलिंग फॅनला दोन साड्या बांधल्या. मायाने गळ्याला फास लावला. आकाश भानावर आला. त्याने मायाचे पाय धरून तिला वाचविण्याचा प्रयत्न केला; परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. मुलीच्या रडण्याच्या आवाजाने आकाशची आई जागी झाली.  तेव्हा मायाने गळफास घेतल्याचे दिसले. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल होईल असे निरीक्षक सचिन इंगोले यांनी सांगितले. 

Web Title: Shocking! Wife commits suicide by hanging in front of husband