५ वर्षीय मुलगा वेदनेने विव्हळला, वडिलांना म्हणाला; १४ वर्षीय दादाने घरात नेले अन्...

By सुमित डोळे | Updated: May 2, 2024 16:01 IST2024-05-02T15:59:19+5:302024-05-02T16:01:46+5:30

धक्कादायक! १४ वर्षीय मुलाकडून पाच वर्षाच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार

Shocking! Unnatural rape of five year old boy by 14 year old boy | ५ वर्षीय मुलगा वेदनेने विव्हळला, वडिलांना म्हणाला; १४ वर्षीय दादाने घरात नेले अन्...

५ वर्षीय मुलगा वेदनेने विव्हळला, वडिलांना म्हणाला; १४ वर्षीय दादाने घरात नेले अन्...

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्यात १४ वर्षांच्या मुलाने परिसरातीलच ५ वर्षांच्या मुलाला घरात बोलावून अनैसर्गिक अत्याचार केला. मुलाला वेदना होत असल्याचे पालकांना सोमवारी लक्षात आल्यानंतर ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पाेलिस ठाण्यात अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

५ वर्षांच्या मुलाचे कुटुंब चिकलठाणा परिसरात राहते. २८ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता तो खेळत असताना आरोपी मुलाने त्याला खेळण्याचा बहाणा करून घरात बोलावले. त्यानंतर त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला. लहान मुलाला प्रचंड वेदना सुरू झाल्याने त्याने घरी जाऊन आक्रोश सुरू केला. घडलेल्या घटनेबाबत त्याला पालकांना सांगता आले नाही. मात्र, वडिलांनी विश्वासात घेतल्यानंतर त्याने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. वडिलांनी पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर १४ वर्षांच्या मुलावर भादंवि ३७७ सह कलम ०५ बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Shocking! Unnatural rape of five year old boy by 14 year old boy