माजी सरपंचाच्या मुलाच्या खुनाचा धक्कादायक उलगडा; माय-लेकाची दृश्यम स्टाईल प्लॅनिंग फेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:07 IST2026-01-21T13:06:05+5:302026-01-21T13:07:23+5:30

राजकीय वैमनस्य नव्हतं, तर कारण काही वेगळंच!; 'दृश्यम','क्राइम पेट्रोल' पाहून माय-लेकाने रचला खुनाचा कट

Shocking revelation in the murder of the former sarpanch's son Raju Pawar; Mother- Son's Drishyam style planning failed! | माजी सरपंचाच्या मुलाच्या खुनाचा धक्कादायक उलगडा; माय-लेकाची दृश्यम स्टाईल प्लॅनिंग फेल!

माजी सरपंचाच्या मुलाच्या खुनाचा धक्कादायक उलगडा; माय-लेकाची दृश्यम स्टाईल प्लॅनिंग फेल!

कन्नड (छत्रपती संभाजीनगर): कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट शिवारात १३ जानेवारी रोजी झालेल्या राजू रामचंद्र पवार (वय ४५) यांच्या खुनाचा तपास लावण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. सुरुवातीला ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज होता, मात्र सखोल तपासात ही हत्या वंदना पवार आणि तिचा मुलगा धीरज ऊर्फ टेमा या दोघांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे. शारीरिक संबंधांच्या मागणीला कंटाळून हा कट रचल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

काय आहे नेमकी घटना?
राजू पवार यांचा मृतदेह १३ जानेवारी रोजी जामडी शिवारातील वनभागात आढळला होता. राजू पवार यांचे वडील माजी सरपंच होते आणि सध्या त्यांच्या काकू गावाच्या सरपंच आहेत. त्यामुळे या हत्येचे पडसाद राजकीय वर्तुळात उमटले होते. मात्र, पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने संशयावरून वंदना पवार हिची विचारपूस केली. सुरुवातीला माहिती लपवणाऱ्या वंदना हिने विश्वासात घेतल्यानंतर खुनाची कबुली दिली.

'दृश्यम' स्टाईलने रचला कट
वंदना हिने दिलेल्या माहितीनुसार, मयत राजू पवार तिच्याकडे शारीरिक संबंधांची मागणी करत होता. या त्रासाला कंटाळून तिने मुलगा धीरजला सर्व हकीकत सांगितली व त्याला ठार मारण्याचा कट रचला. १३ जानेवारी रोजी सकाळी वंदनाने राजूला शेतात भेटायला बोलावले. तो तिथे येताच धीरजने त्याच्या डोक्यात प्रहार केला आणि वंदनाने त्याचे गुप्तांग दाबून त्याला ठार मारले.

पोलिसांची चकवणूक करण्याचा प्रयत्न
आरोपींनी 'दृश्यम' चित्रपट आणि 'क्राइम पेट्रोल' मालिका पाहून पुरावा नष्ट करण्याचे नियोजन केले होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी मृतदेहापासून काही अंतरावर विरुद्ध दिशेला राजूचा मोबाईल फोडून टाकला आणि चपलाही फेकून दिल्या. मृतदेह वनविभागाच्या दाट झाडीत नेऊन एका झाडाच्या मुळाखाली पाण्यात लपवला होता.

बंजारा भाषेतून मिळाला सुगावा
या तपासात पोलिसांना मोठी अडचण येत होती. अखेर पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत यांनी बंजारा भाषा अवगत असणाऱ्या व्यक्ती आणि महिलांची गुप्तपणे गावात नेमणूक केली. त्यातून मिळालेल्या माहितीनुसार वंदना पवारवर संशय बळावला आणि अवघ्या आठ दिवसांत पोलिसांनी या क्लिष्ट गुन्ह्याचा उलगडा केला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर पोलीस अधिक्षक अन्नपूर्णा सिंह, सहायक पोलीस अधिक्षक अपराजिता अग्निहोत्री यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपुत, स.पो.नि. पवन इंगळे, स.पो.नि. सुधीर मोटे, उपनि महेश घुगे, पोह/विष्णु गायकवाड, रवि लोखंडे, प्रमोद पाटील, अशोक वाघ, शिवानंद बनगे, सुनिल गोरे, सचिन राठोड, दीपक सूरोसे, जनाबाई चव्हाण, पो. अमलदार महेश बिरुटे, अनिल काळे, बलविरसिंग बहुरे, योगेश तरमाळे, जीवन घोलप, गणेश घोरपडे, राजेश राठोड, संजय तांदळे, नीलेश कुडे, शिवानी मगर तसेच पो.स्टे. कन्नड ग्रामीणचे स.पो.नि. रामचंद्र पवार, पो. उपनि. अमोल जाधव, पोह अजय मोतिंगे,पोह/कैलास करवंदे, धिरज चव्हाण, लक्ष्मण गवळी, दिलवरसिंग वसावे, बाबासाहेब धनुरे. सविता सोनवणे, मोनिका सिरसाठ यांनी केली.

Web Title : सनसनीखेज हत्या का खुलासा: कन्नड़ में माँ-बेटे का 'दृश्यम' प्लॉट विफल

Web Summary : कन्नड़ में एक पूर्व ग्राम प्रधान के बेटे की हत्या के आरोप में एक माँ और बेटे को गिरफ्तार किया गया। उन्होंने अपराध कबूल करते हुए दावा किया कि पीड़िता ने माँ को अवांछित प्रस्तावों से परेशान किया था। दोनों ने फिल्म 'दृश्यम' से प्रेरित होकर हत्या को छुपाने की असफल कोशिश की।

Web Title : Shocking Murder Solved: Mother-Son's 'Drishyam' Plot Fails in Kannad

Web Summary : A mother and son were arrested for murdering a former village head's son in Kannad. They confessed to the crime, claiming the victim harassed the mother with unwanted advances. The duo unsuccessfully attempted to cover up the murder, inspired by the movie 'Drishyam'.