धक्कादायक ! अंध व्यक्तीच्या हत्येनंतर पेट्रोल टाकून मृतदेहाचा चेहरा जाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 18:49 IST2020-02-20T18:42:12+5:302020-02-20T18:49:16+5:30

हत्येनंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा पेट्रोल टाकून जाळण्यात आला

Shocking! Killing a blind person and burning his face by Petrol | धक्कादायक ! अंध व्यक्तीच्या हत्येनंतर पेट्रोल टाकून मृतदेहाचा चेहरा जाळला

धक्कादायक ! अंध व्यक्तीच्या हत्येनंतर पेट्रोल टाकून मृतदेहाचा चेहरा जाळला

वैजापूर : एका अंध व्यक्तीची लोखंडी गजाने मारहाण करून हत्या केल्याची घटना तालुक्यातील तिडी शिवारात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. हत्येनंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी चेहरा पेट्रोल टाकून जाळण्यात आल्याचा  धक्कादायक प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, तिडी ते संवदगाव रस्त्यावर गट क्रमांक २४ मधील रघूनाथ डूकरे यांच्या शेतातात ग्रामस्थांना गुरुवारी सकाळी एक मृतदेह आढळून आला. याबाबत पोलीस पाटील जयश्री डुकरे यांनी वैजापूर पोलीसांना दिली. माहीती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजणकर, पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी घटनास्थळी भेट दिली. स्थानीक गुन्हे शाखा, ठसेतज्ञ, श्वान पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. घटनास्थळी लोखंडी गज, एक अंध व्यक्तीची काठी, काडी पेटी, पेट्रोलची बाटली पोलीसांना मिळून आली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी हे करीत आहेत. दरम्यान, सदर मृतदेह हा कसाबखेडा येथील अशरफ नूर (२५) यांचा असण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Shocking! Killing a blind person and burning his face by Petrol