धक्कादायक ! आठ दिवसांपूर्वी कोरोना लस घेतलेल्या पोलीस हवालदाराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 17:57 IST2021-02-20T17:54:34+5:302021-02-20T17:57:56+5:30
भास्कर शंकर मेटे (वय ५२,रा. मयूरपार्क) असे मयत हवालदाराचे नाव आहे. मेटे हे बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते.

धक्कादायक ! आठ दिवसांपूर्वी कोरोना लस घेतलेल्या पोलीस हवालदाराचा मृत्यू
औरंगाबाद: आठ दिवसांपूर्वी कोरोनाची लस घेतलेल्या पोलीस हवालदाराचा कोरोनासदृश्य आजाराने शुक्रवारी (दि.१९) सायंकाळी मृत्यू झाला.
भास्कर शंकर मेटे (वय ५२,रा. मयूरपार्क) असे मयत हवालदाराचे नाव आहे. मेटे हे बेगमपुरा पोलीस ठाण्यात कार्यरत होते. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, मेटे यांनी कोरोना कालावधीत मोठे काम केले. १३ फेब्रुवारी रोजी त्यांच्यासह बेगमपुरा पोलीस ठाण्यातील अन्य अधिकारी, कर्मचारी यांनी कोरोनाचा पहिला डोस घेतला होता. लस घेतल्यानंतर ते कामावर हजर झाले होते. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि ताप आल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना जळगाव रोडवरील एम्स रुग्णालयात दाखल केले होते.
तेथील डॉक्टरांनी त्यांचा सिटीस्कॅन केले. सिटी स्कॅनच्या अहवालानुसार डॉक्टरांनी त्यांना कोरोनाची लक्षणे असल्यामुळे त्यांना अधिक उपचारांसाठी एमजीएम कोविड सेंटर येथे पाठविले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. याविषयी हर्सूल ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार नीळ हे तपास करीत आहेत. मेटे यांच्या पश्चात पत्नी, बीएचएमएसचे शिक्षण घेत असलेली कन्या आणि बारावीत असलेला मुलगा असा परिवार आहे.