शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

महेश नवमीनिमित्त आज शोभायात्रा

By admin | Updated: June 13, 2016 00:48 IST

औरंगाबाद : माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश उत्सव साजरा केला जात आहे. सोमवारी १३ जूनला महेश नवमीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे.

औरंगाबाद : माहेश्वरी समाजाच्या वतीने महेश उत्सव साजरा केला जात आहे. सोमवारी १३ जूनला महेश नवमीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. याशिवाय खडकेश्वर मंदिरात रुद्राभिषेक, कार डेकोरेशन स्पर्धा, रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. महेश नवमीनिमित्त माहेश्वरी समाजाच्या वतीने खडकेश्वर महादेव मंदिरात सकाळी ७ वाजता रुद्राभिषेक करण्यात येणार आहे. दुपारी २ ते ४ वाजेदरम्यान कार डेकोरेशन स्पर्धा घेण्यात येणार आहे. ही स्पर्धा खडकेश्वर मंदिराच्या मैदानात घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कार सजावटीतून राष्ट्रीय समस्यांना वाचा फोडण्यात येणार आहे. या सर्व सजविलेल्या कार शोभायात्रेत सहभागी होणार आहेत. रक्तदान महान दान असल्यामुळे महेश नवमीचे औचित्य साधून तापडिया नाट्यमंदिरात दुपारी ४ वाजेपासून रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. महेश नवमीचे मुख्य आकर्षण असणारी शोभायात्रा दुपारी ४ वाजता खडकेश्वर मैदानापासून निघणार आहे. यात विविध सजीव, निर्जीव देखाव्यांचा समावेश असणार आहे. खडकेश्वर मैदानापासून शोभायात्रा सुरू होऊन नागेश्वरवाडी, बाळकृष्ण मंदिर, जिल्हा परिषद, औरंगपुरामार्गे निराला बाजार येथे तापडिया नाट्यमंदिरात पोहोचणार आहे. विविध उपक्रम व शोभायात्रेत समाजबांधवांनी हजर राहावे, असे आवाहन माहेश्वरी मंडळाचे अध्यक्ष अनिल सोनी यांनी केले आहे.