शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

गावे टँकरमुक्त करण्यासाठी शिवजलक्रांती

By admin | Updated: August 18, 2015 00:51 IST

जालना : जलयुक्त शिवार योजनेद्वारे आगामी पाच वर्षांत राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील. पण सरकारी यंत्रणेला मर्यादा असल्याने उर्वरित गावांनाही न्याय मिळावा,

जालना : जलयुक्त शिवार योजनेद्वारे आगामी पाच वर्षांत राज्यातील पाच हजार गावे दुष्काळमुक्त होतील. पण सरकारी यंत्रणेला मर्यादा असल्याने उर्वरित गावांनाही न्याय मिळावा, या हेतूने शिवसेनेच्या वतीने शिवजल क्रांती उपक्रम हाती घेण्यात आला आहे. याद्वारे मराठवाड्यातील अनेक गावांत पाणीटंचाई दूर हेईल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी पत्र परिषदेत व्यक्त केला.जालना जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीची पाहणी करण्यासाठी उद्योगमंत्री देसाई यांनी विविध ठिकाणांना भेटी दिल्या. पत्रकारांशी बोलताना देसाई म्हणाले की, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या शिवसेनेच्या धोरणानुसार आम्ही विविध उपक्रम राबवित असून, पक्षाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न हाती घेण्यात येणार आहेत. त्यापैकी शिवजलक्रांती हा उपक्रम असल्याचे देसाई म्हणाले. पाणीटंचाई दूर करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने ५ हजार गावे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निवडली आहेत. पण टंचाईग्रस्त गावांची संख्या मोठी असल्याने केवळ टँकरवर अवलंबून असलेल्या गावांची जबाबदारी शिवसेनेने उचलत तेथे शिवजल क्रांती उपक्रम राबवत आहे. राज्यात अनेक वर्षांपासून मोठ्या धरणांची कामे रखडली आहेत. यामध्ये पाणी काही जिरले नाही, मात्र पैसा मोठ्या प्रमाणात जिरल्याचे टीकाही त्यांनी यावेळी केली. मराठवाड्यात २००० हेक्टर हे लागवडीचे क्षेत्र आहे. मात्र, केवळ ५०० हेक्टर क्षेत्रात पाणलोट विकास कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणावर सिंचनांची कामे करावी लागणार आहे. यासाठी ही लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा देसाई यांनी व्यक्त केली. यासाठी स्वयंसेवी संस्था व जलतज्ज्ञांचीही मदत घेतली असून, लाहोटी आणि प्रफुल्ल कदम हे मार्गदर्शन करीत आहेत. दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजना करण्यात आली असून, याद्वारे दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील अशा सर्व शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्य वितरित केले जाणार असल्याचे देसाई म्हणाले. पत्र परिषदेस आमदार अर्जुन खोतकर, संपर्क नेते विनोद घोसाळकर, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर , ए.जे. बोराडे, शिवाजी चोथे, औरंगाबादचे अंबादास दानवे, माजी आ. संतोष सांबरे, जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, शहरप्रमुख विष्णू पाचफुले, बाळा परदेशी, संतोष मोहिते, दिनेश फलके आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त पक्षाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले असून, यामध्ये ई- प्रबोधन, शुद्ध पाणी पुरवठा, सोलार दिवे आदींचा समावेश असणार आहे. ४अनुशेष दूर करण्यापेक्षा प्रश्न सुटले पाहिजेत ही पक्षाची भूमिका असून, त्या दृष्टिनेच विविध समाजपयोगी उपक्रम शिवसेनेच्या वतीने राबविले जात असल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले. ४जालना तालुक्यातील नाव्हा, बाजी उम्रद, वखारी या गावांतील सुमारे ३०० बंधारे, नाले व बांधबदिस्ताची खोली वाढविण्यात आली. आमदार अर्जुन खोतकर यांनी राबविलेल्या या उपक्रमामुळे परिसरात जलसाठा वाढल्याचे देसाई म्हणाले. हा उपक्रम न राहता एक लोकचळवळ व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.