शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

युती होण्यापूर्वीच शिवसेनेचे संपर्क अभियान तर भाजपाची संवाद यात्रा सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2019 12:54 IST

पुर्व मतदारसंघात राज्यमंत्री, नगरसेवकांत शब्दांची रणधुमाळी

ठळक मुद्देऔरंगाबाद पश्चिम मतदारसंघात स्पर्धा

- विकास राऊत

औरंगाबाद: पश्चिम मतदारसंघात शिवसेनेचे संपर्क अभियान तर भाजपाने संवादयात्रा सुरू केली आहे. शिवसेना-भाजपा युतीचा निर्णय होण्यापूर्वीच इच्छुकांनी कंबर कसली आहे. तर पूर्व मतदारसंघातही युती होण्यावरून राज्यमंत्री अतुल सावे आणि शिवसेना नगरसेवक राजू वैद्य यांच्यात एका कार्यक्रमाप्रसंगी शब्दांची रणधुमाळी झाली.

भाजपाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असलेले नगरसेवक राजू शिंदे यांनी मतदारांशी संपर्क करीत शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यास सुरूवात केली आहे. भाजपाचे दुसरे इच्छुक बाळासाहेब गायकवाड यांनी मंगळवारपासून संवाद यात्रेतून विविध घटकातील मतदारांना स्वपरिचय व पक्ष धोरण सांगण्यास सुरूवात केली आहे.  शिवसेनेचे इच्छुक नगरसेवक मनोज गांगवे यांनी बुधवारी पद्मपुरा परिसरातील आप्तेष्टांच्या भेटीगाठी घेत मतदारांचा कल जाणून घेतला. भाजपाचे चंद्रकांत हिवराळे यांनी कार्यालय थाटले आहे. हा सगळा राजकीय गदारोळ पाहता, पश्चिममधील राजकारण युती होण्यापूर्वी ढवळून निघाले आहे. तर त्याचे लोण हळू-हळू पूर्व मतदारसंघातही पसरू लागले आहे. या सगळ्या प्रकारामुळे विद्यमान आमदारांची मात्र गाळण उडू लागली आहे.

भाजपाचे इच्छुक संवाद यात्रेतून मतदार संघातील विविध स्तरातील मतदारांच्या भेटी घेत स्वत:चा परिचय देत आहेत. यात्रेतून सरकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासह पक्षाने राबविलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती ते देत आहेत. डॉक्टर, वकील, व्यापारी, कामगारांच्या भेटी भाजपाचे इच्छुक घेत आहेत. शिवसेनेकडून इच्छुक असलेले गांगवे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी समाजबांधवांनी १० हजारांहून अधिक मतदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र पक्षप्रमुखांना पाठविण्याचा निर्धार केला. तर भाजपातील इच्छुकांमध्ये मतदारांच्या संपर्काची जोरदार स्पर्धा लागली आहे.

पुर्वमध्ये युतीवरून कलगीतुराराज्यमंत्री अतुल सावे विद्यानगरचे नगरसेवक राजू वैद्य हे विशालनगरमधील रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी एकाच व्यासपीठावर होते. या कार्यक्रमाप्रसंगी वॉर्डातील ज्येष्ठ नागरिक म्हणाले, युती झाली तर आम्ही राज्यमंत्री सावे यांच्यासोबत राहू, नाहीतर पाहू...ते नागरिक असे म्हणताच सावे व त्यांच्या समर्थकांनी युती झाली आहे, असे जाहीर करून टाकले. दरम्यान नगरसेवक वैद्य यांनी सावे व त्यांच्या समर्थकांना उत्तर देतांना सांगितले, युतीचा निर्णच वरिष्ठ पातळीवर होणार आहे. जो निर्णय होईल, त्यानुसार आमची भूमिका असेल. राज्यमंत्र्यांनी युती जाहीर करून टाकली तर शिवसेनेने वरिष्ठांकडे बोट दाखविल्यामुळे कार्यक्रमस्थळी शब्दांच्या रणधुमाळीची जोरदार चर्चा होती.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाvidhan sabhaविधानसभाMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Aurangabadऔरंगाबाद