शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका

By बापू सोळुंके | Updated: November 2, 2025 17:44 IST

'राज्यात महायुतीचे सरकार हे दगाबाज आहे. यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. '

छत्रपती संभाजीनगर: शिंदेसेनेचे नेते तथा मंत्री शंभूराजे देसाई यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणूकीत स्वतंत्र लढण्याविषयी भाष्य केले. मात्र त्यांच्या भाष्याला काहीच किंमत नाही, कारण शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे आहेत. यामुळेच त्यांच्या नेत्यांना वारंवार दिल्लीला जावे लागते, अशी खरमरीत टीका माजी विरोधीपक्षनेते तथा उद्धवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी आज (दि. ९) येथे पत्रकार परिषदेत केली.

दानवे म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार हे दगाबाज आहे. यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार शेतकऱ्यांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. निवडणूक आयोगावरील टीकेला भाजपवाले उत्तर देतात. अशा परिस्थितीत महायुतीतील एक घटक पक्ष असलेल्या शिंदेसेनेचे एक नेते आगामी निवडणूक स्वतंत्र लढणार असल्याच्या विधानाला काहीच अर्थ नाही. शिंदेसेना भाजपच्या मर्जीवरच चालणारा पक्ष आहे. म्हणूनच पक्षाचे नेते एकनाथ शिंदे यांना वारंवार दिल्लीला जावे लागते, अशी टीका दानवे यांनी एका प्रश्नाचे उत्तर देताना केली.

छत्रपती संभाजीनगर शहरात खूनाचे सत्र थांबत नसल्याकडे दानवे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, आपल्या शहरातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडली आहे. फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या हातावरील सुसाईड नोटनूसार त्यांची आत्महत्या असल्याची नोंद झाली आहे. मात्र हा खूनच असल्याचा आरोप दानवे यांनी केला. या घटनेचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन केली ही चांगली बाब आहे. मात्र एसआयटीमध्ये निष्पक्ष अधिकाऱ्यांची नेमणूक करावी,अशी आमची मागणी आहे. ८ नोव्हेंबर नंतर फलटण येथे डॉ. संपदा मुंडे प्रकरणात आम्ही मोर्चा काढणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena: Favors received, work dictated, Danve criticizes sharply.

Web Summary : Ambadas Danve criticizes Shinde Sena as reliant on BJP, doing only as told, necessitating frequent Delhi visits. He also criticized the state government for unfulfilled promises to farmers and deteriorating law and order, demanding impartial SIT in Dr. Munde's death case.
टॅग्स :Ambadas Danweyअंबादास दानवेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा