शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

हदगाव येथे चोर्‍यांची मालिका

By admin | Updated: May 16, 2014 00:16 IST

हदगाव : शहरात पूर्वीच्या चोरीचा तपास अपूर्ण असतानाच भुरट्या चोरांनी शहरात धुमाकूळ घातला.

हदगाव : शहरात पूर्वीच्या चोरीचा तपास अपूर्ण असतानाच भुरट्या चोरांनी शहरात धुमाकूळ घातला. नागरिक भीतीच्या वातावरणात वावरत आहेत. याउलट पोलिस तक्रार घेण्यासाठी तयार नसल्याची माहिती मिळाली. गेल्या आठवड्यामध्ये ७ मेपासून द्रोणागिरीनगर, शिक्षक कॉलनी, आयोध्यनगर आदी भागात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. परंतु नागरिकांच्या सतर्ककतेमुळे त्यांना मोठा हात मारता आला नाही. परंतु आठवड्याच्या प्रत्येक रात्रीला चोरांचे आगमन या भितीमुळे बालक व महिलावर्ग बेजार आहे. एन. वाय. काळे या शिक्षकाच्या घरी त्यांच्या पत्नी व लहान मुलगी घरी असताना ८ मेच्या मध्यरात्री २.२० वाजता चोरांनी प्रवेश केला. बाहेरुन दारांना कड्या लावल्या व पाळीव कुत्र्यासमोर व कुलरमध्ये नशेचे पावडर टाकल्यामुळे कुत्रा व काळे यांच्या पत्नी बेहोश झाल्या. परंतू त्यांच्या मुलीने घरात चोर घुसत असल्याचे पाहून शेजारी दादाराव ढोले यांना फोन केला. त्यांनी बाहेर आल्यामुळे चोरांनी पळ काढला. पंडित कदम (मेसवाले) यांच्या घरीही ९ मे रोजी चोरांनी प्रवेश केला व ७ हजार रुपये रोकड पळविली. यानंतर पळसा येथील अशोक चक्रवर्ती शाळेवर शिक्षक असलेल्या काकडे यांच्या घरातही प्रवेश केला. यानंतर १० मे रोजी क्षीरसागर यांच्या घरी चोरीचा प्रयत्न फसला. या विषयी हदगाव पोलिस ठाण्याला नागरिकांनी वीस ते पंचवीस नागरिकांनी अर्ज दिला. परंतु अर्ज घेऊन दाख न करताच तपास हातावर ठवला आहे. पोलिसांच्या या बघ्यच्या भूमिकेमुळे चोरांची हिम्मत वाढत आहे. आयोध्यानगरात एक महिन्यापूर्वी चोरी झाली होती. जैन मंदिरात चोरी झाली. त्या घटनेचा तपास शून्य असताना चोरट्यांनी पोलिसांना आवाहन केले आहे. सुट्यामुळे व लग्नसरईमुळे नागरिक कुलूप ठोकून बाहेरगावी जात आहेत. त्याचाच फायदा चोरटे घेत आहेत. (वार्ताहर)