छत्रपती संभाजीनगर:शहरातील अत्यंत गजबजलेल्या क्रांती चौक परिसरातील भाजप आमदार संजय केनेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात शुक्रवारी रात्री एक अज्ञात व्यक्ती बॅग विसरून गेला होता. आज सकाळी ही बॅग उघडल्यानंतर त्यात पिस्तूल आढळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आमदारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
नेमकी घटना काय?आमदार केनेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कार्यालयात रोज नागरिकांची मोठी गर्दी असते. शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कोणीतरी एक काळी बॅग कार्यालयात विसरून गेले. आमदारांच्या पीएने (खाजगी सचिव) ती बॅग सुरक्षित उचलून ठेवून दिली. मात्र, आज सकाळी जेव्हा ती बॅग तपासली असता त्यात एक पिस्तूल आढळून आले.
धमकवण्याचा प्रयत्न - केनेकर यांचा आरोपया घटनेवर प्रतिक्रिया देताना आमदार संजय केनेकर म्हणाले, "निवडणुकीच्या काळापासून मला सातत्याने धमक्या येत आहेत. मी अनेक घोटाळ्यांबाबत तक्रारी केल्या आहेत, त्यामुळे मला धमकवण्यासाठी हा प्रकार केला असावा असा माझा संशय आहे. त्या व्यक्तीचा उद्देश नेमका काय होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही."
सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांचा तपासघटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रांती चौक पोलिसांनी पिस्तूल जप्त केले असून अधिक तपास सुरू केला आहे. "कार्यालयातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, ती बॅग घेऊन आलेली व्यक्ती कोण होती, याचा शोध लवकरच लावला जाईल," असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Web Summary : A pistol was discovered in an unattended bag at BJP MLA Sanjay Kenekar's office in Chhatrapati Sambhajinagar. Kenekar alleges threats due to his complaints about scams. Police are investigating using CCTV footage to identify the person who left the bag.
Web Summary : छत्रपति संभाजीनगर में भाजपा विधायक संजय केनेकर के कार्यालय में एक लावारिस बैग में पिस्तौल मिली। केनेकर ने घोटालों की शिकायत के कारण धमकियां मिलने का आरोप लगाया है। पुलिस सीसीटीवी फुटेज से बैग छोड़ने वाले व्यक्ति की जांच कर रही है।