शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ वि. वि. चिपळूणकर यांचे औरंगाबाद येथे निधन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2018 13:15 IST

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्याव्यासंगी वि. वि. चिपळूणकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ९० वर्षांचे होते.

औरंगाबाद : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ व विद्याव्यासंगी वि. वि. चिपळूणकर यांचे आज सकाळी निधन झाले. ते ९०  वर्षांचे होते. शिक्षण क्षेत्रातील कार्य आणि 'चिपळूणकर समिती'च्या अहवालामुळे ते सर्वांना परिचित होते. राज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर चिपळूणकर शहरात स्थायी झाले होते. त्यांच्या पार्थिव देहावर आज सायंकाळी अंत्यसंस्कार होणार आहेत.

विद्याधर विष्णु चिपळूणकर यांनी राज्याचे शिक्षण संचालक म्हणून निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय शिक्षण नियोजन प्रशासन संस्थेचे सल्लागार म्हणूनही अनेक वर्ष काम केले. त्यांचा जन्म १३ एप्रिल १९२९ रोजी विर्ले पार्ले, मुंबई येथे झाला. त्यांनी १९७६ टे १९८६ या कालावधीत राज्याचे शिक्षणसंचालक म्हणून काम पाहिले होते. 

'चिपळूणकर समिती' द्वारे सर्वपरिचित वि. वि. चिपळूणकर यांनी माध्यमिक शिक्षक, शासकीय विद्यानिकेतनचे प्राचार्य, शिक्षणाधिकारी, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षणसंचालक अशा विविध पदांवर काम केले होते. यासोबतच ते बालभारतीचे  माजी संचालक पण होते. बालभारतीच्या उभारणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. राज्यात गुणवत्तापूर्ण दर्जेदार शिक्षण देण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. 'चिपळूणकर समिती'च्या अहवालामुळे ते सर्वदूर परिचित झाले .

शिक्षकांसाठी आजही मार्गदर्शक कार्य चिपळूणकर यांनी १९४८ मध्ये एक शिक्षक या नात्याने शिक्षणक्षेत्रात पदार्पण केले. १९८७ मध्ये ते राज्याच्या शिक्षण संचालक पदावरून निवृत्त झाले. निवृत्तीनंतरच्या काळातही त्यांचे शैक्षणिक योगदान समाजाला लाभले. त्यांची आतापर्यंतची कारकीर्द  राज्यातील शिक्षकांसाठी आजही मार्गदर्शक व प्रेरक ठरत आहे. शिक्षण क्षेत्रातील बदल आणि आव्हाने यावर त्यांनी विपुल लेखनसुद्धा केले आहे. या लेखनाचे संकलन ''कणा शिक्षणाचा' आणि ''आव्हान प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेचे'' यात करण्यात आले आहे. 

टॅग्स :Deathमृत्यूEducationशिक्षणSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र