शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

लोकशाहीसाठी काँग्रेसला निवडून द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:31 AM

देशातील सामाजिक एकोपा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन आज येथे काँग्रेसच्या नेत्यांनी केले. देशातील वाढत्या दलित अत्याचाराविरोधात देशभर काँग्रेसतर्फे सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले.

ठळक मुद्देऔरंगाबाद : गांधी पुतळ्यासमोर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे लाक्षणिक उपोषण

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : देशातील सामाजिक एकोपा आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी आगामी निवडणुकांमध्ये काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन आज येथे काँग्रेसच्या नेत्यांनी केले. देशातील वाढत्या दलित अत्याचाराविरोधात देशभर काँग्रेसतर्फे सोमवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहर व जिल्हा काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने शहागंजमधील गांधी पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी पदाधिकाऱ्यांनी भाषणे करून मोदी सरकारवर टीकेची झोड उठविली व या सरकारमुळे देश कसा हुकूमशाहीकडे वाटचाल करीत आहे व सामाजिक एकोपा कसा धोक्यात येत चालला आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला.

जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार, आमदार सुभाष झांबड, केशवराव औताडे, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुरेखा पानकडे, डॉ. कल्याण काळे, जि.प.चे उपाध्यक्ष केशवराव तायडे, समता सैनिक दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, किरण पा. डोणगावकर आदींच्या नेतृत्वाखाली हे उपोषण झाले. त्यात रेखा जैस्वाल, रवींद्र काळे, जितसिंग करकोटक, शेषराव तुपे पाटील, अ‍ॅड. सुभाष देवकर, बबनराव डिडोरे पाटील, कल्याण कावरे, किशोर तुळसीबागवाले, अतिष पितळे, अ‍ॅड. इक्बालसिंग गिल, रामभाऊ शेळके, यशवंत कदम, संदीप बोरसे, जगन्नाथ खोसरे, पपींद्रपालसिंग वायटी, सागर साळुंके, मुदस्सर अन्सारी, इब्राहिम पठाण, सायली जमादार, अर्चना मंत्री, पंकजा माने, विजया भोसले, संजीवनी महापुरे, अनिता भोसले, सीमा थोरात, सरोज जेकब, उज्ज्वला दत्त, जयपाल दवणे, योगेश मसलगे पाटील, हरिभाऊ राठोड, सचिन शिरसाट, अनिल श्रीखंडे, डॉ. जितेंद्र देहाडे, डॉ. पवन डोंगरे, अ‍ॅड. सय्यद अक्रम, नंदकिशोर सहारे, अल्ताफ पटेल, राजूकाका नरवडे, वैशाली राऊत, प्रदीप मोहिते, प्रकाश वाघमारे, बाबूराव कावसकर, उत्तम दणके, नायबराव दाभाडे, जगदीश लहाने, संतोष भिंगारे, सुरेश पवार, प्रवीण निकम पाटील, सलमा सलीम पठाण, नसरीन पठाण, आकेफ रजवी, संगीता लहुगीर, शुकंतला साबळे, माया बागूल, बाळासाहेब भोसले, कमालखाँ पठाण, कैलाश उकिर्डे आदींनी सहभाग घेतला. भर उन्हात हे उपोषण करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

जिल्हाभरातील शेकडो पदाधिका-यांचा सहभागसकाळी १० ते ५ यावेळेत शहर व जिल्हा काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने हे उपोषण करण्यात आले. यात जिल्हाभरातील कार्यकर्ते, महिला, युवक, सेवादल आदींनी सहभाग घेतला. प्रारंभी, महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

टॅग्स :agitationआंदोलनAurangabadऔरंगाबादcongressकाँग्रेसAbdul Sattarअब्दुल सत्तारSubhash Zambadसुभाष झांबड