शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीला हाय अलर्ट! आत्मघाती दहशतवादी हल्ल्याची शक्यता; BJP मुख्यालय, सरकारी कार्यालये रडारवर
2
लखनौमध्ये भाजप नेत्यावर गोळीबार, प्रकृती चिंताजनक; ट्रामा सेंटरबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी
3
डोकं वापरा...! नेहराचा मास्टरस्ट्रोक अन् DSP सिराजनं वैभव सूर्यवंशीसमोर दाखवलं मॅजिक (VIDEO)
4
मोठी बातमी! खासदार सुप्रिया सुळे यांच्या कारला अपघात, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील घटना
5
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या TMC नं केली विरोधी पक्षनेत्याची घोषणा, कुणाला मिळाली जबाबदारी?
6
'करामती' खानच्या फिरकीची जादू; यशस्वीच्या नेतृत्वाखाली RR अपयशी, विक्रमी विजयासह GT नं मारली मुसंडी
7
उन्हाळ्यात कलिंगड खाणं पडलं महागात! बक्सरमध्ये एकाच कुटुंबातील ८ जणांना विषबाधा; आरोग्य विभाग अलर्टव
8
मुंबई-बंगळूरू ट्रेनचे फायनल टाइमटेबल आले, १३ मे रोजी सुरू; पुणे-मिरज मार्ग, स्लीपर वंदे भारत?
9
अखेर पेच सुटला! 'टीव्हीके' प्रमुख जोसेफ विजय उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; असा गाठला बहुमताचा आकडा
10
Vaibhav Suryavanshi World Record: वैभव सूर्यवंशी जगात भारी! षटकारांच्या शतकासह १५ व्या वर्षी भीम पराक्रम
11
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
12
सुवेंदू अधिकारी ते हिमंता बिस्व सरमा, भाजपने दुसऱ्या पक्षातून आलेल्या कोण कोणत्या नेत्यांना बनवलं थेट मुख्यमंत्री? बघा संपूर्ण यादी
13
खामेनेईंबद्दल अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा मोठा रिपोर्ट; ट्रम्प यांचे टेन्शन वाढले, सगळे दावे फोल!
14
अतरंगी फटका मारण्याच्या नादात शतक हुकलं; पण गिलनं सलग सातव्यांदा हा पराक्रम करून दाखवत रचला इतिहास
15
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
16
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
17
Rohit Sharma: रोहितसोबत सेल्फी घेताना महिलेचा फोन झाला बंद; मग हिटमॅन म्हणाला असं काही, सगळेच हसले!
18
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
19
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
20
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अपघातातील गायब बॅगचे रहस्य वाढले; चौकशीचे आदेश

By admin | Updated: July 4, 2014 00:20 IST

आखाडा बाळापूर : डोंगरगाव (पुल) शिवारात घडलेल्या अपघातग्रस्त गाडीतील पंचनामा होण्याअगोदरच पोलिसांनी लांबवलेल्या बॅगचे रहस्य वाढल्याने आखाडा बाळापूर परिसरात चर्चेला उधान आले.

आखाडा बाळापूर : हैदराबाद- इंदौर जाणाऱ्या कारला कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव (पुल) शिवारात घडलेल्या अपघातग्रस्त गाडीतील पंचनामा होण्याअगोदरच पोलिसांनी लांबवलेल्या बॅगचे रहस्य वाढल्याने आखाडा बाळापूर परिसरात चर्चेला उधान आले असून या घटनेची चौकशी सुरू असल्याचे सपोनि पंडित कच्छवे यांनी सांगितले.
हैदराबाद येथून मध्य प्रदेशातील इंदौरकडे जाणाऱ्या गांज्या तस्करी करणाऱ्या कारला कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पुल शिवारात अपघात घडला होता. यामध्ये दोनजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला होता. अपघातग्रस्त इंडिगो कारमध्ये दीड क्विंटलच्यावर गांजा असल्याने व अपघात भयंकर घडल्याने बघ्याची गर्दी वाढली होती. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांचे पथकही हजर झाले. तत्पुर्वीच कळमनुरी येथे दारुच्या गुन्ह्यातील शेवाळा येथील आरोपींना आखाडा बाळापूर पोलिस ठाण्याचा कर्मचारी घेवून जात होते. मात्र अपघात घडल्याने आरोपीसह घटनास्थळाकडे धाव घेतली. जखमींना उपचारासाठी पाठवून दिले. मात्र अपघातग्रस्त गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात गांजाची पोती होती. प्रत्यक्षदर्शनीनुसार गाडीमध्ये पैशाची बॅगही होती तर प्रेताच्या खिशातही मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही दिसत होती. यातील रोख रक्कम व पैशाची बॅग मात्र पंचनामा होण्याअगोदरच गायब झाल्याने चर्चेला पेव फुटले व गायब बॅगचा शोध सुरू झाला; परंतु पंचनामा संपला तरी बॅग व रोख रक्कम दिसून येत नव्हती. पत्रकारांनी या घटनेकडे लक्ष वेधले असता सुरूवातीला अशी कोणती बॅगच नसल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप यांनी सांगितले; परंतु पत्रकारांनी प्रश्न लावून धरल्याने काही वेळाने बॅग उघडली तर त्यामध्ये कपडे व खेळणी निघाली. तरीही घटनास्थळापासून पाच कि.मी. अंतर असलल्या पोलिस ठाण्यामध्ये ती बॅग अगोदरच घाई गडबडीने आणण्याचे प्रयोजन काय? ती बॅग सुरवातीला का उघडण्यात आली नाही? असे अनेक प्रश्न नागरिकांत उपस्थित होत आहेत. (वार्ताहर)