शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
4
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
5
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
6
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
7
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
8
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
9
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
10
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
11
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
12
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
13
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
14
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
15
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
16
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
17
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
18
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
19
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
20
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत २७ रोजी मराठवाड्यातील टंचाई आढावा बैठक

By admin | Updated: November 18, 2014 01:05 IST

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय टंचाई आढावा बैठक बोलाविली आहे. ही बैठक २७ नोव्हेंबर रोजी होणार असून,

औरंगाबाद : मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विभागीय टंचाई आढावा बैठक बोलाविली आहे. ही बैठक २७ नोव्हेंबर रोजी होणार असून, त्यासाठी विभागातील सर्व जिल्ह्यांकडून अपूर्ण नळ योजना, त्या पूर्ण करण्यासाठी लागणारा खर्च आदींची माहिती मागविण्यात आली आहे. बैठकीचे ठिकाण मात्र निश्चित झालेले नाही. पुरेशा पावसाअभावी यंदा संपूर्ण मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. आॅगस्टनंतर पाऊसच न झाल्यामुळे विभागातील खरिपाची पिके हातची गेली आहेत. ठिकठिकाणच्या विहिरी, कूपनलिकांनी तळ गाठला आहे. विभागातील लघु, मध्यम आणि मोठे प्रकल्पही रिकामेच राहिले आहेत. त्यामुळे बहुतांश गावांमध्ये आताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. महसूल विभागातर्फे दोन दिवसांपूर्वी खरीप हंगामातील सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात आली. त्यात मराठवाड्यातील ८,१३९ गावांपैकी तब्बल ८,००४ गावांची पैसेवारी पन्नास पैशांपेक्षा खाली आली आहे. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी, तसेच दुष्काळ निवारणारच्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशी मागणी होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येत्या २७ नोव्हेंबर रोजी मराठवाडा विभागातील टंचाईचा आढावा घेणार आहेत. ही बैठक औरंगाबादेत होणार की मुंबईत, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी त्यासाठी मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांकडून टंचाई परिस्थिती आणि उपाययोजनांची माहिती मागविण्यात आली आहे. याशिवाय कोणत्या जिल्ह्यात किती नळ पाणीपुरवठा योजना अपूर्ण आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी किती खर्च लागणार आहे, याची माहितीही सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.