शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
2
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
3
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
4
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
5
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
6
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
7
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
8
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
9
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
10
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
11
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
12
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
13
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
14
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

सव्वालाख पशुधनासाठी डॉक्टरांची वानवा

By admin | Updated: July 24, 2014 00:07 IST

नितीन कांबळे , कडा तालुक्यात जवळपास सव्वालाख पशुधन आहे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी पाहण्यासाठी डॉक्टरांची मात्र वानवा आहे.

नितीन कांबळे , कडातालुक्यात जवळपास सव्वालाख पशुधन आहे. त्यांच्या आरोग्याची जबाबदारी पाहण्यासाठी डॉक्टरांची मात्र वानवा आहे. अनेक ठिकाणच्या जागा वर्षानुवर्षे रिक्त असल्याने वेळ प्रसंगी शेतकऱ्यांना खाजगी पशुचिकित्सकांकडे जनावरांना घेऊन जावे लागते. यावर मोठा खर्चही होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.आष्टी तालुका हा बीड जिल्ह्यात दुग्धोत्पादनामध्ये अग्रेसर आहे. तालुक्यात बहुतांश डोंगराळ व पठाराच्या भागात शेती असल्याने बागायती जमीनही मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. दुसरे म्हणजे या तालुक्यातील ऊसतोड मजूरही मोठ्या प्रमाणात ऊसतोडीला जातात. यासाठीही त्यांच्याकडे बैलजोडी असते. शिवाय शेती कसण्यासाठीही अनेकांकडे पशुधन आहे. एकंदरीत तालुक्यात सध्या लहान- मोठे सव्वा लाखापेक्षा जास्त पशुधन आहे. या पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी २१ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. यामध्ये प्रथमश्रेणीचे १४ तर द्वितीय श्रेणीचे ७ पशुचिकित्सालये आहेत. येथे सध्या पंधरा पशुधन अधिकारी असून त्यांच्यावरच पशुधनाच्या आरोग्याची जबाबदारी आहे. येथील सुलेमान देवळा, पिंपळा, जामगाव, टाकळसिंग, हरिनारायण आष्टा, डोईठाण या श्रेणी १ च्या दवाखान्यात अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नसल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. शेती कसताना किंवा इतर वेळी अनेकदा जनावरांना इजा होते. अशावेळी शेतकरी जवळच्या पशुवैद्यकीय चिकित्सालयात जनावरांना घेऊन जातात. अशावेळी तेथे डॉक्टर नसल्याने शेतकऱ्यांना निराश होऊन परतावे लागते. अशावेळी नाइलाजाने शेतकऱ्यांना खाजगी पशु चिकित्सकाकडून उपचार करून घ्यावे लागतात. अनेकदा गाय, म्हैस गंभीर आजारी असल्यास त्यांना दवाखान्यात आणणेही शक्य होत नाही. अशा वेळी डॉक्टरांना शेतकऱ्यांच्या गोठ्यावर घेऊन जावे लागते. मात्र दवाखान्यातच डॉक्टर नसल्यास गोठ्यावर कसे घेऊन जाणार त्यामुळे शेतकऱ्यांना खाजगी चिकित्सकाला न्यावे लागते. यावर शेतकऱ्यांचा मोठा खर्च होत असल्याने रिक्त जागा भरण्यासह औषधी उपलब्ध करण्याची मागणी राम खाडे, दादा गव्हाणे यांनी केली आहे. याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. दीपक राठोड म्हणाले, रिक्त जागा भरण्यासाठी वरिष्ठांना अहवाल दिला आहे.डॉक्टरांच्या जागा भरण्याची मागणीआष्टी तालुक्यात २१ ठिकाणी आहेत पशुवैद्यकीय दवाखाने.पंधरा अधिकाऱ्यांवरच २१ ठिकाणच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांचा भार.सुलेमान देवळा, पिंपळा, जामगाव, टाकळसिंग आदी ठिकाणच्या जागा रिक्त.