शहरं
Join us  
Trending Stories
1
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
4
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
5
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
6
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
7
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
8
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
9
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
10
दुसऱ्या प्रेग्नंसीमुळे ॲटलीच्या 'राका'मध्ये दीपिका पादुकोणची सीन्स कट? मेकर्सने दिलं स्पष्टीकरण
11
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
12
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
13
ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भरता गरजेची; भारताने होर्मुझ संकटातून धडा घ्यावा, अनिल अग्रवाल यांचे सुचक विधान
14
Divyanka Sirohi : भावाने दरवाजा लावायला सांगितला, परत येऊन पाहिलं तर...; अभिनेत्री दिव्यांका सिरोहीच्या मृत्यूची Inside Story
15
IRCTC: रेल्वे पॅन्ट्रीत कीटक-उंदरांचा वाढता उपद्रव; प्रवाशांच्या तक्रारींनंतर प्रशासनाकडून दखल
16
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
17
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
18
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
19
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
20
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या तिजोरीत साडेसात कोटी

By admin | Updated: May 26, 2015 00:51 IST

औरंगाबाद : मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई नगर परिषदेच्या तिजोरीत एकूण ७ कोटी ४६ लाख रुपयांची रक्कम निघाली

औरंगाबाद : मनपात नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा-देवळाई नगर परिषदेच्या तिजोरीत एकूण ७ कोटी ४६ लाख रुपयांची रक्कम निघाली. समावेशामुळे ही रक्कम पालिकेकडे वर्ग झाली आहे. दरम्यान, महापौर त्र्यंबक तुपे यांनी सोमवारी पालिकेच्या लेखा विभागाला पत्र देऊन साताऱ्यातील रक्कम तिथेच विकासकामांवर खर्च करावी, ती शहरातील कामांसाठी वळवू नये, असे निर्देश दिले. मनपात पाच दिवसांपूर्वीच सातारा-देवळाई नगर परिषदेचा समावेश झाला. या समावेशानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडून सर्व कागदपत्रे ताब्यात घेतली.त्याबरोबरच नगर परिषदेच्या ठेवीही पालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. महापौर तुपे यांनी साताऱ्याच्या तिजोरीतील जमा रकमेची माहिती घेतली. तेव्हा तेथे ७ कोटी ४६ लाख रुपये असल्याचे आढळून आले. ही रक्कम साताऱ्यात विकासकामांवर खर्च करावी, तिचा वापर शहरातील इतर कामांसाठी करू नये यासाठी त्यांनी आज लेखा विभागाला तसे पत्र दिले. स्टेट बँक आॅफ इंडिया, सेंट्रल बँक, स्टेट बँक आॅफ हैदराबाद, अ‍ॅक्सिस बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आदी बँकांमध्ये हा निधी जमा आहे. २ कोटी २१ लाख रुपयांचा निधी १३ व्या वित्त आयोगातून मिळालेला आहे. १ कोटी १६ लाख रुपयांचा निधी दलित वस्ती सुधार कार्यक्रमात मिळाला आहे. तसेच नगरोत्थान महाअभियानांतर्गतही ७९ लाख रुपये मिळाले आहेत. ४याशिवाय साताऱ्यात काही दिवसांपूर्वी नगर परिषदेकडून अनधिकृत बांधकामे पाडण्याची मोहीम सुरू होती. या मोहिमेंतर्गत न्यायालयाच्या आदेशानुसार बिल्डरांनी नगर परिषदेकडे अनामत म्हणून जमा केलेल्या १ कोटी ६९ लाख रुपयांचाही समावेश आहे. तसेच कर भरणामधून मिळालेले ८३ लाख आणि रस्ते अनुदानाचे २ कोटी १४ लाख रुपयांचा वरील निधीत समावेश आहे.