शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

सरपंचपदाचा अर्जच आॅनलाईनवर उपलब्ध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:47 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे भावी सरपंच सोमवारचा मुहूर्तावर लव्याजम्यासह आॅनलाईन केंद्रांवर धडकले मात्र सरपंचपदाचा फॉर्म किंवा कोणती माहिती आॅनलाईनवर उपलब्ध नव्हती. तहसील कार्यालयातही यासंदर्भात माहिती नव्हती. त्यामुळे भावी सरपंचांचा पहिलाच दिवस वायफळ गेला व हिरमोड झाल्याचे चित्र आहे.

चंद्रकांत देवणे ।लोकमत न्यूज नेटवर्कवसमत: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सोमवारपासून आॅनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे भावी सरपंच सोमवारचा मुहूर्तावर लव्याजम्यासह आॅनलाईन केंद्रांवर धडकले मात्र सरपंचपदाचा फॉर्म किंवा कोणती माहिती आॅनलाईनवर उपलब्ध नव्हती. तहसील कार्यालयातही यासंदर्भात माहिती नव्हती. त्यामुळे भावी सरपंचांचा पहिलाच दिवस वायफळ गेला व हिरमोड झाल्याचे चित्र आहे.वसमत तालुक्यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ४ तारखेपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सरपंचपद पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडल्या जाणार असल्याने भावी सरपंचांची संख्याही प्रचंढ वाढलेली आहे. आॅनलाईन अर्ज भरावयाचे आहेत. अर्ज भरण्यासाठीची कमी कालावधी, सण, सुट्या व आॅनलाईनचे सर्व्हर डाऊन होण्याच्या परंपरेमुळे पहिल्या दिवसांपासून अर्ज भरण्याची तयारी सर्वांची होती.गावोगावचे भावी सरपंच तर सोमवारी सकाळीच आपापल्या गावातील ग्रामदेवतेला नारळ फोडून लवाजम्यासह वसमतला धडकले. तहसील कार्यालयात निवडणूक विभागाकडे सरपंचपदासाठी अनामत रक्कम भरण्यासाठी गेले तर ती किती हेच निवडणूक विभागाला माहीती नव्हते. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठीही आॅनलाईनच्या साईडवर सरपंचपदाचे फॉर्म उपलब्ध नाहीत. दिवसभर वसमतमध्ये तळ ठोकून बसलेले भावी सरपंच हतबल झाले असल्याचे पहावयास मिळाले.भरीसभर सोबत आणलेला लव्याजम्याचा खर्चही भावी सरपंचावरच पॅनलमधील सदस्यांचाही भार पॅनलप्रमुख म्हणजेच भावी सरपंचावरच. त्यामुळे ‘खाया पिया कुछ नही, गिलास फुटा बाराणा’ अशीच अवस्था झाली. अर्ज भरण्यासाठी काढलेला मुहूर्त व फोडलेला नारळही वाया गेला तो वेगळाच. या प्रकारासंदर्भात अनेकांनी निवडणूक विभागात धाव घेऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर तिथेच काही माहिती नसल्याने तुम्हीच निवडणूक विभागाशी संपर्क साधा आणि नक्की काय ते शोधा अशाही सूचना ऐकावयास मिळाल्याचे काही जणांनी सांगितले.या प्रकरणी नायब तहसीलदार सचिन जोशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पहिल्यांदाच सरपंचपद जनतेतून निवडल्या जात आहे. त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्याचे काम निवडणूक आयोगाकडून सुरू असेल. त्यामुळे आज सॉफ्टवेअरमधील दुरूस्तीसाठी सरपंचपदासंदर्भातील माहिती व आॅनलाईनसाठीचा फॉर्म उपलब्ध झालेला नसावा, असे त्यांनी सांगितले.निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरमधील बदलाच्या प्रक्रियेमुळे अर्ज भरण्याचा पहिला दिवस तर वाया गेला आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने सरपंचपदासाठी आता अर्ज भरण्याची मुदतही एक दिवसाने वाढवून देण्याची मागणी अनेक भावी सरपंचांनी केली आहे. मुदतीनंतर एक मिनीट उशिराही जर अर्ज स्वीकारले जात नसतील तर आमचा एक दिवस कमी झाला. त्याची भरपाई कोणी करावी, असा युक्तिवादही होत आहे.