साड्या चोरणाऱ्या महिलांना पकडले

By Admin | Updated: September 7, 2014 00:53 IST2014-09-07T00:45:26+5:302014-09-07T00:53:26+5:30

वाळूज महानगर : साडी खरेदीचा बहाणा करून तीन साड्या लंपास करणाऱ्या दोन महिलांना आज वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.

Sapis caught women stealing | साड्या चोरणाऱ्या महिलांना पकडले

साड्या चोरणाऱ्या महिलांना पकडले

वाळूज महानगर : साडी खरेदीचा बहाणा करून तीन साड्या लंपास करणाऱ्या दोन महिलांना आज वाळूज पोलिसांनी अटक केली आहे.
वाळूजच्या गणेशनगरात मच्छिंद्र मन्साराम हुले यांचे त्रिमूर्ती कलेक्शन नावाचे कापड दुकान आहे. आज दि.३ रोजी दोन अनोळखी महिला दुकानात साड्या खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. साड्या खरेदीचा बहाणा करून त्यांनी वेगवेगळ्या रंगाच्या साड्या दाखविण्याचे दुकान मालक हुले यांना सांगितले. या महिलांसमोर ते वेगवेगळ्या साड्या टाकून कोणत्या साड्या पसंत करत याची वाट पाहत होते. दरम्यान, दुकानात दुसरे ग्राहक आल्यामुळे हुले हे त्यांना कपडे दाखवत असताना शिताफीने या महिलांनी तीन साड्या चोरून आम्हाला साड्या पसंत नसल्याचे सांगून त्या दुकानातून निघून गेल्या. या महिला दुकानातून निघून गेल्यानंतर दुकान मालक हुले यांना तीन साड्या गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी आसपास या महिलांचा शोध घेतला. मात्र. त्या मिळून न आल्याने त्यांनी वाळूज पोलीस ठाण्यात धाव घेऊन साड्या चोरणाऱ्या अनोळखी महिलांची माहिती दिली. ही माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सुवर्णा देगलूरकर यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने साड्या चोरणाऱ्या करुणा लखन भोसले व दिव्या अविनाश काळे या दोघींना अटक केली.

Web Title: Sapis caught women stealing