शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

'समृद्धी'वरील वेगाच्या थरारात बचावले ६ जीव; कार चार कोलांट्या घेऊन रस्त्याच्या पलीकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2022 11:52 IST

समृद्धी महामार्गावरील लासूर गाव ते पोटूळच्या दरम्यान भरधाव वेगात चारचाकीचे चाक फुटल्यामुळे अपघात घडला.

- शेख मुनीरऔरंगाबाद :समृद्धी महामार्गावरील वेगाच्या थरारात सहा जीव बचावल्याची घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास लासूर स्टेशन परिसरात घडली. गाडीने नागपूरकडे जाणारा रस्ता ओलांडून चार कोलांट्या घेत विरुद्ध दिशेच्या कडेला जाऊन गाडी आदळली. अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी जखमींना मदत केली.

शिर्डी येथून एक आलिशान चारचाकी (एमएच ३१ ईके १३६२) नागपूरच्या दिशेने जात होती. या गाडीमध्ये दोन महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुले होती. हे सर्व जण समृद्धी महामार्गावरून नागपूरकडे जात होते. त्यांच्यासोबत आणखी एक गाडी होती. ती गाडी वेगात पुढे निघून गेल्यानंतर पाठीमागे पडलेल्या गाडीच्या चालकाने समृद्धीवरून थरारक पद्धतीने वाहन दामटण्यास सुरुवात केली. लासूर स्टेशनच्या पुढे निघाल्यानंतर पोटूळजवळ आल्यानंतर अतिवेगात असल्यामुळे गाडीचे चाक फुटले. त्यामुळे गाडीने नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावरून क्रॉसिंग करीत शिर्डीकडे जाणाऱ्या रस्त्यावर चार वेळा कलंडली. 

या भीषण अपघातात सुदैवाने गंभीर इजा झाली नाही. सहा प्रवाशांना किरकोळ मार लागला. या प्रवाशांच्या मदतीसाठी महामार्गाच्या सुरक्षेसाठी असलेले कर्मचारी, रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी पोहोचली. जखमींवर रुग्णवाहिकेतच तत्काळ उपचार करण्यात आले. यावेळी परिसरातील नागरिकांनीही घटनास्थळी पाहण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गAurangabadऔरंगाबादAccidentअपघात