शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
4
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
5
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
6
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
7
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
8
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
9
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
10
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
11
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
12
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
13
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
14
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
15
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
16
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
17
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
18
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
19
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
20
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस नसल्याने बळीराजा चिंतित

By admin | Updated: June 19, 2014 00:16 IST

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत.

कोळगाव: गेवराई तालुक्यातील कोळगाव परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. मान्सून सुरू होऊन आठवडा लोटला तरी अद्यापही पाऊस न पडल्याने शेतकरी चिंतीत आहेत. अनेक शेतकऱ्यांनी महागडे बियाणे खरेदी केले आहे. असे असले तरी पाऊस न पडल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत.कोळगावसह परिसरातील काजळा, तांदळा, साठेवाडी, खडकी, टाकळगव्हाण, काळेवाडी, माणकापूर , सावरगाव या परिसरातील शेतकऱ्यांची शेती मशागतीची कामे पूर्ण झाली आहेत. या परिसरातील शेतकऱ्यांनी उन्हाळ्यातच नांगरणी, पाळी, मोगडा आदी कामे केली होती. तर १ जून लागताच अनेक शेतकऱ्यांनी बियाणांची खरेदीही केली आहे. असे असले तरी पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात असल्याचे अ‍ॅड. उद्धव रासकर यांनी सांगितले. या परिसरातील शेतकऱ्यांनी शेत मशागतीसह बियाणांवर मोठा खर्च केला आहे. यामुळे वेळेवर पेरणी होणे गरजेचे असल्याचे शेतकऱ्यातून सांगण्यात येते. मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास उत्पादन चांगल्या प्रकारे होते. तसेच पिकांवर रोगराईही पडत नाही व दुबार पीक घेण्यास शेतकऱ्यांना सोपे जात असल्याचे पोखरी येथील सुनील धस यांनी सांगितले. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी ठिबक सिंचनद्वारे कपाशीची लागवड केली आहे. ठिबक सिंचन करण्यास शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागला होता. शेतकऱ्यांच्या विहिरीला पाणी असल्यामुळे त्यांनी कपाशी लावलेली आहे. मात्र आता पाऊसच न पडल्याने विहिरींची पाणी पातळी दिवसेंदिवस खालावत आहे. यामुळे ठिबक सिंचनद्वारे कपाशीची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनाही पावसाची प्रतिक्षा आहे.सलग दोन वर्षांपासून या परिसरात उशिराने पाऊस पडत असल्याने याचा उत्पादनावर परिणाम झाला आहे. या वर्षीही वेळेवर पाऊस न पडल्यास पेरणीसाठी अडचण येईल, असे शेतकरी बाळू जोगदंड म्हणाले. (वार्ताहर)ठिबक सिंचन केलेले शेतकरीही अडचणीतकोळगाव परिसरातील काही शेतकऱ्यांनी ठिबकवर कपाशी लावली आहे. पाऊस न पडल्याने हे शेतकरीही अडचणीत आल्याचे दिसून येत आहे.मशागती पूर्ण झाल्या असतानाही पावसाअभावी पेरण्या रखडल्या.वेळेवर पेरणी न झाल्यास उत्पादन घटण्याची शेतकऱ्यांना चिंता.