सा.बां. कर्मचार्यांचे लेखणी बंद आंदोलन
By Admin | Updated: May 23, 2014 00:19 IST2014-05-22T23:52:44+5:302014-05-23T00:19:27+5:30
लातूर : कार्यकारी अभियंता विवेक बडे यांना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे़

सा.बां. कर्मचार्यांचे लेखणी बंद आंदोलन
लातूर : सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक बडे यांना शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी गुरुवारी दुपारपासून लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे़ सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विवेक बडे यांच्या दालनात जाऊन शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी लातूरचे कंत्राटदार प्रशांत पाटील व महेश देवणे यांनी बुधवारी दिली होती़ या घटनेचा निषेध करीत सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचार्यांनी गुुरुवारी दुपारी १ वा़ पासून लेखणी बंद आंदोलन सुरु केले आहे़ या आंदोलनात उपकार्यकारी अभियंता एम़ एऩ गायकवाड यांच्यासह ए़ टी़ डहाने, आऱ एस़ पवार, एम़ एऩ अंबसंगे, बी़ व्ही़ सरवदे, पी़ पी़ डंके, व्ही़ बी़ सोनटक्के, एस़ एस़ केंद्रे, एन.डी. सावंत, ए.ए. पाटील, जी.बी. भोकरे, जी.एस. मस्के, डब्ल्यू.ए. उपाडे, जी.आर. कुलकर्णी, मनोज देशमुख, एस.पी. कावळे, व्ही.एच. पांढरे, जे.बी. कुलकर्णी, डी.एन. वलसे, बी.डी. कांबळे आदी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)