शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

रुपीचे खातेदार लढा उभारणार

By admin | Updated: November 5, 2014 00:59 IST

औरंगाबाद : खातेदारांचे पैसे अडकून ठेवण्यापेक्षा धनाढ्य कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढा. कर्जदारांना पाठीशी घालण्यापेक्षा खातेदारांचे पैसे द्या, असा संताप आज रुपी बँकेच्या खातेदारांनी व्यक्त केला

औरंगाबाद : खातेदारांचे पैसे अडकून ठेवण्यापेक्षा धनाढ्य कर्जदारांच्या मालमत्ता लिलावात काढा. कर्जदारांना पाठीशी घालण्यापेक्षा खातेदारांचे पैसे द्या, असा संताप आज रुपी बँकेच्या खातेदारांनी व्यक्त केला. या पुढे या बँकेच्या राज्यभरातील खातेदार, ठेवीदारांच्या विविध संघटनांनी एकत्र येऊन न्यायालयीन व सरकारी पातळीवरील लढा संयुक्तरीत्या उभारण्याचा निर्णय शहरातील बैठकीत घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेने २१ फेब्रुवारी २०१३ रोजी रुपी बँकेवर प्रशासक नेमला आहे व बँकेचा परवाना निलंबित केला आहे. तेव्हापासून बँकेत लाखो रुपये असूनही खातेदारांना ते काढणे कठीण झाले आहे. यासंदर्भात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी शहरातील या बँकेच्या खातेदारांची मंगळवारी सकाळी बैठक झाली. औरंगाबादेतील शाखेत साडेसहा हजार खातेदार असून त्यांच्या खात्यात सुमारे १६ कोटी ५० लाख रुपये अडकून पडले आहेत. खातेदारांना व्याजासह पैसे परत मिळावे यासाठी येथील खातेदार व ठेकेदारांनी एकत्र येऊन जुलै २०१४ रोजी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे, तसेच ग्राहक मंचमध्ये बँकेच्या विरोधात २ दावे दाखल केले. याशिवाय १७ सप्टेंबर रोजी पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्र्यांपासून सर्वांना ई-मेलही पाठविण्यात आले असल्याची माहिती अ‍ॅड. प्रकाश नाईक यांनी दिली.पुणे येथे नुकतेच तेथील पुणेकर नागरिक कृती समिती, रुपी बँक कर्मचारी संघटनेने बँकेच्या संचालकांविरोधात आंदोलन उभे केले आहे. यापुढे आता राज्यात बँकेच्या जेथे जेथे शाखा होत्या तेथील खातेदार व ठेवीदारांच्या संघटनांना एकत्र करून एकत्रित लढा देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला, तसेच संघटनेची पुढील बैठक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता खडकेश्वर परिसरातील एकनाथ संशोधन मंदिरात होणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी अरविंद देशपांडे, श्रीकृष्ण कोल्हारकर, राजेश मेहता, स्मिता देशपांडे, माया जोशी, गीता निधोनकर, कृष्णा कुलकर्णी, डॉ. श्यामराव पिसोळकर, प्रकाश तापी आदी खातेदार हजर होते. ५८ वर्षीय शशिकला सोरमारे या महिलेने सांगितले की, रुपी बँकेत खाते उघडले होते त्यात मुलीच्या लग्नासाठी साडेतीन लाख रुपये ठेवले होते. मात्र, बँक अचानक बंद झाली आणि मागील दीड- दोन वर्षांपासून आमची पैसे बँकेत अडकून पडले. या दरम्यान मुलीचे लग्न ठरले बँकेत रक्कम असूनही उपयोगात आली नाही. अखेर नातेवाईक, ओळखींच्या व्यक्तींकडून आम्ही पैसे उसने घेऊन ३० मे २०१४ रोजी लग्न लावले.माझे पती विठोबा सोरमारे हे पोस्ट खात्यात असून तेही ४ महिन्यांनंतर निवृत्त होणार आहेत. मुलीच्या लग्नासाठी उसनी रक्कम घेतली ती फेडण्यासाठी आता तरी माझी रक्कम बँकेने परत द्यावी, नसता बँकेसमोर उपोषणाला बसेल, असा संतप्त इशाराही त्यांनी दिला.