वाळूज उद्योगनगरीत सरपंचपदासाठी रस्सीखेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:10 IST2021-02-05T04:10:34+5:302021-02-05T04:10:34+5:30
रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, नारायणपूर, पंढरपूर, तीसगाव, आंबेलोहळ, पाटोदा, आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, निकालही जाहीर झाले आहे. ...

वाळूज उद्योगनगरीत सरपंचपदासाठी रस्सीखेच
रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज, नारायणपूर, पंढरपूर, तीसगाव, आंबेलोहळ, पाटोदा, आदी ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, निकालही जाहीर झाले आहे. वाळूज उद्योगनगरीतील श्रीमंत ग्रामपंचायतीचे सरपंच पद पदरात पाडून घेण्यासाठी मातब्बर दावेदारांत रस्सीखेच सुरू आहे. रांजणगावात सरपंचपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित असून, या ठिकाणी माजी सरपंच कांताबाई जाधव, ग्रामपंचायत सदस्या नंदाताई बडे, कविता हिवाळे, योगिता महालकर यांच्यात रस्सीखेच सुरू आहे. जोगेश्वरीत गजानन बोंबले, योगेश दळवी, प्रभाकर काजळे, मीना पनाड यांच्यात सरपंचपदासाठी चढाओढ सुरू आहे. पंढरपुरात वैशाली राऊत, मिरा गिर्हे, वळदगावात माजी सरपंच सीमा पहाडिये, अमर डांगर, वर्षा घोडके, तीसगावात शंकुतला कसुरे व निर्मला बुट्टे, वाळूजला माजी सरपंच सईदाबी पठाण, विमलबाई चापे, मंजूषा जैस्वाल यांच्यात स्पर्धा सुरू आहे.