शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

रोहित्रांची दुरुस्ती संथगतीने..!

By admin | Updated: December 23, 2016 00:19 IST

जालना: जिल्ह्यातील रोहित्रांची स्थिती बिकटच आहे. महावितरणचे दोन्ही विभाग मिळून शंभरपेक्षा अधिक रोहित्रांची दुरूस्ती अद्याप रखडलेली आहे.

जालना: जिल्ह्यातील रोहित्रांची स्थिती बिकटच आहे. महावितरणचे दोन्ही विभाग मिळून शंभरपेक्षा अधिक रोहित्रांची दुरूस्ती अद्याप रखडलेली आहे. परिणामी शेतकरी तसेच वीज ग्राहकांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात महावितरणचे विभाग क्रमांक एक व दोन अंतर्गत १०० व ६३ केव्हीए क्षमतेचे १५ हजार रोहित्र आहेत. रोहित्रांची संख्या मोठी असली तरी जळण्याचे प्रमाणही तेवढेच आहे. विभाग एक अंतर्गत जालना, बदनापूर, भोकरदन व जाफराबाद या तालुक्यांचा समावेश आहे. चार तालुक्यांतील १०० व ६३ क्षमतेचे ७० पेक्षा अधिक रोहित्र जळाले आहेत. हे सर्व रोहित्र जालना येथील विविध एजन्सीकडे दुरूस्तीसाठी आहेत. मात्र, महावितरणच्या संथगतीच्या कारभारामुळे रोहित्र दुरूस्तीची प्रक्रिया कासवगतीने सुरू आहे. तालुक्यातील शेतकरी रोहित्र दुरूस्तीसाठी कन्हैयानगर येथील कार्यशाळेत खेटे घालत आहेत. दिवसाकाठी प्रत्येक तालुक्यात आठ ते दहा रोहित्रांत बिघाड होत असल्याचे महावितरणचे अधिकारी सांगतात. तर विभाग दोनमध्ये अंबड, घनसावंगी, परतूर व मंठा या तालुक्यांचा समावेश आहे. या विभागातातील सिंगज तसेच थ्री फेजचे मिळून ४० रोहित्र दुरूस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. वास्तवित पाहता रोहित्र दुरूस्तीस दिल्यावर आठवडाभराच्या आत देणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक गावांतील रोहित्र आठवड्यानंतरही मिळत नाही. पाच दुरूस्ती एजन्सी असूनही रोहित्र दुरूस्त होण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)