शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
4
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
5
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
6
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
7
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
8
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
9
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
10
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
11
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
12
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
13
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
14
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
15
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
16
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
17
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
18
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
19
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
20
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
Daily Top 2Weekly Top 5

पाटोदा तालुक्यात रस्त्यांची दुरवस्था

By admin | Updated: July 31, 2014 00:42 IST

पाटोदा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत.

पाटोदा : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अतिशय दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांना हाल सहन करावे लागत आहेत. जिल्हा परिषद व सा.बां. विभागाचे मिळून सातशे पन्नास कि.मी.चे तालुक्यात रस्ते आहेत. रस्त्यांच्या दुरूस्तीवर अनेकदा लाखोंची उधळण करण्यात येते. मात्र हे काम तद्दन असल्याचे रस्त्याची पुन्हा जैसे थे अवस्था होते.सा.बां. विभागांतर्गत लिंबादेवी फाटा ते पांढरवाडी फाटा हा जुना राष्ट्रीय महामार्ग ४० कि.मी.चा आहे. या रस्त्याची चाळणी झाली असल्याने ग्रामस्थांसह प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या उपविभागांतर्गत उंबरहिवरा ते डिघोळ (२५ कि.मी.), मांजरसुंबा ते पाटोदा (३२ कि.मी.), लिंबादेवी फाटा ते सौताडा (२४ कि.मी.), डोमरी - थेरला (२७ कि.मी.), कचरवाडी- वैद्यकिन्ही- पाचंग्री (२५ कि.मी.), डोंगरकिन्ही- चुंबळी (१२ कि.मी.), पिंपळवंडी- कुसळंब (१३ कि.मी.), मुगगाव - हातोला- चिंचोली (२९ कि.मी.), सौताडा- भुरेवाडी- मुगगाव (१६ कि.मी.), कुसळंब- चिंचोली (१६ कि.मी.), पाटोदा ते साकत (७ कि.मी.) असे एकूण २५० कि.मी.चे रस्ते येतात. या रस्त्यांपैकी केवळ सौताडा ते लिंबादेवी या दरम्यानचा रस्ताच चांगला आहे. इतर रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले असल्याने रात्री- अपरात्री वाहनेही नादुरूस्त होतात. त्यामुळे आर्थिक भुर्दंड तर पडतोच; शिवाय प्रवाशांना रस्त्यातच अडकून बसावे लागते. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनाही रस्त्यांमुळे ये- जा करण्यास अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. जिल्हा परिषदेच्या बांधकाम उपविभागांतर्गतही तालुक्यात ९१७ कि.मी.चे रस्ते आहेत. त्यामध्ये प्रमुख जिल्हा मार्ग (१५६ कि.मी.), इतर जिल्हा मार्ग (५७ कि.मी.) तर ग्रामीण रस्ते (३८४ कि.मी.) आहेत. यातील ६८ कि.मी. डांबरीकरण , १६० कि.मी. खडीकरण तर १५६ कि.मी.चे रस्ते कच्चे आहेत. या कच्च्या रस्त्यांमुळे शेतकऱ्यांनाही शेतीमाल घरी आणण्यासह इतर अडचणी येतात. रस्त्यांची दुरवस्था झाल्याने रस्ते दुरूस्तीसाठी जि.प. व सा.बां. विभागाकडून लाखो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र ही कामेही दर्जेदार न केल्याने रस्त्याची पुन्हा जैसे थे अवस्था होते. यामुळे ग्रामस्थांचे हाल कायमच असल्याने झालेल्या रस्ता कामाची चौकशी करावी व रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. रस्त्यांच्या कामाबाबत सा.बां.चे उपअभियंता ल.यु. साळुंके म्हणाले की, ज्या रस्त्यांच्या कामाबाबत तक्रारी आहेत तेथील चौकशी करून दोष आढळल्यास कारवाई करू. तसेच नवीन रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी निधीची मागणी केली आहे.(वार्ताहर)पाटोदा तालुक्यात ७५० कि.मी.चे रस्ते पाटोदा तालुक्यात सा.बां. विभागाचे अडीचशे कि.मी.चे तर जि.प.कडे ५०० कि.मी.चे आहेत रस्तेअनेक रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी लाखोंचा खर्च करूनही रस्त्यावर पुन्हा खड्डेग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने ग्रामस्थांचे हाल कायमरस्त्यांच्या कामाची चौकशीची मागणी