शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

रिमझिम गाणी, झलक सुहानी गाण्यांचा कार्यक्रम

By admin | Updated: July 30, 2015 00:20 IST

जालना : लोकमत सखी मंच आणि कलर्स च्या वतीने ‘रिमझीम गाणी झलक सुहानी’ हा हिंदी व मराठी गाण्यांवर आधारित कार्यक्रम सखीमंचच्या सदस्यांसाठी

जालना : लोकमत सखी मंच आणि कलर्स च्या वतीने ‘रिमझीम गाणी झलक सुहानी’ हा हिंदी व मराठी गाण्यांवर आधारित कार्यक्रम सखीमंचच्या सदस्यांसाठी दि. १ आॅगस्ट २०१५ रोजी दुपारी ३ वाजता अंबड रोडवरील मातोश्री लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे. सर्व लोक आतुरतेने पावसाची वाट पाहात आहे, धरतीसुध्दा पावसाने चिंब भिजण्यासाठी तळमळत आहे. पावसाची चाहूल लागताच हवेत आलेल्या गारव्यामुळे उन्हाची काहिली ओसरते. ओल्या मातीच्या मोहक सुगंधाने मन मोहरुन जाते. मग ओठातून एखादे आवडीचे गाणे गुणगुणण्यास सुरवात होते. आपल्या आयुष्यातही नविन पावसाची सर गारवा, आपलेपणाचा ओलावा आणि सुखाची नवी हिरवळ घेवून यावी, या अनुषंगाने या सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात सुप्रसिध्द गायक अनघा काळे, गौरव पवार, रवींद्र खोमणे हे गायक गाणी रसिकांसाठी सादर करणार आहेत. लोकमत सखीमंच सदस्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नियमित करते. याचा भाग म्हणून महिला सदस्यांना पावसाळ्याची मेजवानी म्हणून हा खास गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भारतातील सर्वात मोठा सेलिब्रीटी डान्सशो झलक दिखला जा दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता कलर्स चॅनलवर सुरू आहे. आतापर्यंत न बघितलेल्या झलक दिखला जा च्या या सिझनमध्ये नवीन पिढीचा आवडता कलाकार शाहीद कपूर व कल्पक दिग्दर्शक करण जोहर, परीक्षक म्हणून डान्स गुरू गणेश हेगडे व लॉरेन गॉटलीसोबत काम बघत आहेत. ज्यामध्ये १२ सेलिब्रीटी आपल्या नृत्याचे कौशल्य दाखवित आहेत. रिमझीम गाणी झलक सुहानि हा कार्यक्रम सखी मंच सदस्यांकरिता नि:शुल्क असून सोबत ओळखपत्र असणे आवश्यक आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल, असे संयोजकांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)