शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्र्यांकडून टंचाईचा आढावा

By admin | Updated: July 14, 2014 01:03 IST

हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होताच सदरचे पंचनामे त्वरित करून शासनाकडे अहवाल पाठवावा.

हिंगोली : जिल्ह्यात झालेल्या गारपिटीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, अशा तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होताच सदरचे पंचनामे त्वरित करून शासनाकडे अहवाल पाठवावा. तसेच पंचनामे करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना पालकमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आयोजित बैठकीमध्ये संभाव्य टंचाईसदृश्य परिस्थितीचा आढावा घेताना पालकमंत्री गायकवाड बोलत होत्या. खा. अ‍ॅड. राजीव सातव, आ. भाऊराव पाटील गोरेगावकर, आ. जयप्रकाश दांडेगावकर, विधान परिषद सदस्य रामराव वडकुते, जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजी पवार, जिल्हा उपनिबंधक विशाल जाधवर आदी उपस्थित होते. प्रा. गायकवाड म्हणाल्या की, जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, याकरिता शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर त्वरित पंचनामे करून सदरचा अहवाल शासनाकडे पाठवावा.तसेच प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून प्रत्येक गावाला पाणीपुरवठा व्हावा, याबाबत दक्षता घेण्याची सूचना प्रा. गायकवाड यांनी केली. टंचाईग्रस्त गावांची टँकर, खाजगी विहीर अथवा बोअरवेल अधिग्रहणांची मागणी आल्यास त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, असेही त्यांनी सांगितले.जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची ५० टक्के पिके गेलेली असून प्रशासनाने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली. प्रारंभी जिल्हाधिकारी नरेंद्र पोयाम यांनी जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची व टंचाईच्या भागात करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात आॅगस्ट अखेरपर्यंत पाणीटंचाई भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पवार यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पेरणी केलेल्या क्षेत्राची माहिती दिली. यात जिल्ह्यात ९ हजार ८०१ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून यापैकी ४ हजार ६०० हेक्टरवर कापूस व २ हजार ७८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी झालेली आहे. प्रशासनाने टंचाईच्या परिस्थितीची माहिती घेवून जिल्ह्यात झालेली पेरणी क्षेत्र, पावसाचे प्रमाण, पाण्याची सद्य:स्थिती याचा अहवाल आपल्याकडे द्यावा, याबाबतची बैठक मदत व पुनर्वसनमंत्री यांच्याकडे घेण्यात येईल, असे पालकमंत्री प्रा. गायकवाड यांनी सांगितले. (प्रतिनिधी)लोकप्रतिनिधी उपस्थितजिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात पालकमंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी बैठकीत संभाव्य टंचाई- सदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला.प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करून प्रत्येक गावाला पाणीपुरवठा होण्याबाबत दक्षता घेण्याची सूचना दिली.जिल्ह्यात गारपिटीने नुकसान झालेला एकही शेतकरी शासकीय मदतीपासून वंचित राहू नये, या करिता शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यावर त्वरित पंचनामे करून सदरचा अहवाल शासनाकडे पाठवावा.टंचाईग्रस्त गावांची टँकर, खाजगी विहीर अथवा बोअरवेल अधिग्रहणांची मागणी आल्यास त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत, असेही प्रा.गायकवाड यांनी सांगितले.जिल्ह्यात पावसाअभावी खरिपाची ५० टक्के पिके गेलेली असून प्रशासनाने तसा अहवाल शासनाकडे पाठविण्याची मागणी लोकप्रतिनिधींनी यावेळी केली.