शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
4
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
5
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
6
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
7
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
8
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
9
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
10
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
11
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
12
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
13
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
14
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
15
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
16
Ola Electric च्या शेअर्समध्ये ६५ टक्क्यांपर्यंत तेजी, अजून वाढ होणार का? काय आहे नवं टार्गेट?
17
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
18
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
19
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींवरच जबाबदारी

By admin | Updated: April 17, 2016 01:33 IST

औरंगाबाद : गावच्या सर्वांगीण विकासासाठी आता ग्रामपंचायतींनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीबरोबरच ग्रामपंचायतींना

औरंगाबाद : गावच्या सर्वांगीण विकासासाठी आता ग्रामपंचायतींनाच पुढाकार घ्यावा लागणार आहे. चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीबरोबरच ग्रामपंचायतींना अन्य स्रोतांपासून मिळणाऱ्या उत्पन्नाच्या दीडपट निधीची विकासकामे वार्षिक विकास आराखड्यात समाविष्ट करून त्यास ग्रामसभेची मंजुरी घ्यावी लागणार आहे. यंदा विकास आराखड्याशिवाय ग्रामपंचायतींना चौदाव्या वित्त आयोगाचा निधी वितरित करण्यात आला असला तरी यापुढे मात्र, वार्षिक विकास आराखड्यानुसारच निधीचे वाटप केले जाणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायतींना आता कात टाकावीच लागेल. यासंदर्भात जि. प. पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके यांनी सांगितले की, पंचायतराज संस्थांच्या त्रिस्तरीय रचनेमध्ये आता जिल्हा परिषद स्तरावर धोरणात्मक निर्णय घेतले जातील. तालुकास्तरावर (पंचायत समिती) पर्यवेक्षकीय भूमिका पार पाडावी लागेल, तर ग्रामस्तरावर प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यानुसार यापुढे गटविकास अधिकाऱ्यांनाच ग्रामपंचायतींच्या कारभारावर लक्ष ठेवावे लागणार आहे. यासंबंधी जिल्ह्यातील सर्व नऊ गटविकास अधिकाऱ्यांची बैठक घेऊन १४ व्या वित्त आयोगाच्या निर्देशानुसार ‘आमचं गाव, आमचा विकास’ या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायतींना वार्षिक विकास आराखडा तयार करावा लागणार असून, तो करताना स्थानिक शेतकरी, महिला, युवक, अनुसूूचित जाती, जमाती, महिला बचत गट, गावातील अशासकीय स्वयंसेवी संस्था, संघटना, अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या सूचनांचा विचार करावा लागणार आहे. त्यानंतर ग्रामसभेसमोर विकास आराखड्याचे सादरीकरण करून त्यास मान्यता घ्यावी लागेल. त्यानंतर तो पंचायत समितीतील (गट स्तर) तांत्रिक समिती छाननी करेल. ही गट स्तरीय छाननी समिती तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींचे आराखडे तांत्रिक छाननी करून सर्व आराखडे एकत्रितरीत्या पुढे जि. प. तील जिल्हा समितीकडे सादर करील. यासाठी ग्रामपंचायतस्तरावर एक ग्राम संसाधन गट स्थापन करावा लागणार आहे. ग्रामपंचायतीच्या सदस्य संख्येच्या तिप्पट सदस्यांची निवड या गटात करणे बंधनकारक आहे. यामध्ये गावातील जाणकार नागरिक, शेतकरी, अनुसूचित जाती, जमाती, महिला, युवक, अपंग, पोलीस पाटील आदींचा समावेश करण्याचे शासनाचे आदेश आहेत. या ग्राम संसाधन गटातील सदस्यांना प्रशिक्षण करण्याची तरतूदही या उपक्रमामध्ये आहे. प्रवीण प्रशिक्षक व प्रभारी अधिकारी हे या सदस्यांना प्रशिक्षण देतील. प्रवीण प्रशिक्षक व प्रभारी अधिकाऱ्यांना यशदामार्फत प्रशिक्षित केले जाणार आहे.