शहरं
Join us  
Trending Stories
1
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
2
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
3
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
4
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
5
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
6
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
7
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
8
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
9
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
10
कमर्शियल LPG दरवाढीचा हॉटेल उद्योगाला जोरदार फटका; खाद्यपदार्थांचे दर १५ टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता
11
भारतीय उद्योगांना चीनचा विळखा; इलेक्ट्रॉनिक, रसायने, औषध क्षेत्र संकटात येण्याची भीती
12
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
13
ईव्हीएममध्ये फेरफार केल्याच्या आरोप; बंगालमधील १५ मतदान केंद्रांवर फेरमतदान सुरू
14
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
15
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
16
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
17
IPL 2026 : वैभव-यशस्वी सुपरहिट जोडीचा फ्लॉप शो! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला दिलासा
18
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
19
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षित जमीनही स्वाहा...

By admin | Updated: June 19, 2014 00:22 IST

रवी गात , अंबड शहरातील अनेक वसाहतीतील ओपन प्लेस (आरक्षित जमीन) गायब झाले आहेत. या आरक्षित जमीनही स्वाहा झाली आहे.

रवी गात , अंबडशहरातील अनेक वसाहतीतील ओपन प्लेस (आरक्षित जमीन) गायब झाले आहेत. या आरक्षित जमीनही स्वाहा झाली आहे. शासकीय विकास नियंत्रण नियमावली अंतर्गत जमिनीची प्लॉटिंग करताना एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के जमीन ओपन प्लेस म्हणून राखीव ठेवणे आवश्यक आहे. मात्र शहरातील बहुतांश जमीनमालकांनी शासकीय कायदा पायदळी तुडवत स्वत:चे खिसे भरण्यासाठी या ओपन प्लेसमध्ये प्लॉटिंग पाडून त्यांची विक्री केली. शहरातील अनेक वसाहतींमधील नागरिकांच्या हक्काच्या ओपन प्लेसमध्ये टोलेजंग इमारती अनधिकृतपणे उभ्या आहेत. हा प्रकार केवळ एक किंवा दोन वसाहतींमध्ये घडला नसून शहरातील अनेक वसाहतींमध्ये हाच कित्ता गिरविण्यात आला आहे. गरिबांचे अनधिकृत बांधकाम पाडण्यास तत्पर असलेले नगरपालिका प्रशासन या अनधिकृत इमारतींवर काय कारवाई करते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.विकास नियंत्रण नियमावलीनुसार जमिनीचे ले आऊट करताना, जमिनीची प्लॉटिंग करताना एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के जमीन ही वसाहतीतील नागरिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या मोकळी हवा, मुबलक प्रकाश, मुलांसाठीचे खेळण्याचे मैदान, बगीचा, जॉगिंग ट्रॅक आदींसाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. शासकीय नियमानुसार वसाहतीतील ओपन प्लेसमध्ये प्लॉटिंग करता येत नाही. ओपन प्लेसमध्ये वसाहतीतील मुलांसाठीचे खेळण्याचे मैदान अथवा बगीचा यांना प्राधान्य आहे.मात्र भूखंडमाफियांनी शहरातील बहुतांश वसाहतीतील ओपन प्लेस गायब केल्या आहेत. अनधिकृत ले आऊट करणे, बांधकाम परवाना न घेता बांधकाम करणे, या बरोबरच वसाहतीतील नागरिकांच्या हक्काच्या असलेल्या ओपन प्लेससुध्दा गिळंकृत केल्याचा प्रकार समोर आला आहे. वसाहतींतील नागरिकांसाठी राखीव असलेल्या या ओपन प्लेसच्या जागेवर आज टोलेजंग इमारती उभ्या असलेल्या पाहावयास मिळतात. अतिक्रमणात असलेल्या छोट्या दुकांनावर, टपरीधारकांवर मोठया धाडसाचा आव आणत कारवाई करणारे नगरपालिका प्रशासन या अनधिकृत इमारतींना बुलडोजर लावणार का? हा खरा प्रश्न आहे. या बरोबरच शहरात अनेक इमारत धारकांनी नगरपालिकेची परवानगी नसताना मजल्यांवर मजले चढविले. एफएसआयपेक्षा जास्तीचे बांधकाम केले, बांधकामांना जी प्लस १ (तळमजला अधिक एक मजला) अथवा जी प्लस २ (तळमजला अधिक दोन मजले) अशी मान्यता असताना बेकायदेशीरपणे इमारतीची उंची वाढवत मजल्यांवर मजले चढविले. अशा अनधिकृत मजले चढविणाऱ्यांवर पालिका प्रशासन काय कारवाई करते, याकडेही नागरिकांचे लक्ष लागले आहे.याविषयी अंबड नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल सूर्यवंशी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, शहरातील काही वसाहतींतील ओपन प्लेसवर प्लॉटिंग करण्यात आल्याची चर्चा कानावर आली आहे. विशेष म्हणजे अशा ओपन प्लेसमधील प्लॉट रजिस्ट्री न करता नोटरीने खरेदी विक्री सुरु असल्याचेही चर्चा आहे. पालिका प्रशासन ओपन प्लेसमध्ये असलेल्या प्लॉटिंगवर कायदेशीर कारवाई करणार असुन पालिका नागरिकांना आवाहन करत आहे की नोटरीच्या आधारे कोणीही प्लॉटिंगची खरेदी विक्री करु नये. ओपन प्लेसमधून कोट्यवधींची कमाईशहरातील अनेक वसाहतींच्या ओपन प्लेसची प्लॉटिंग पाडून त्याव्दारे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार भूखंडमाफियांनी केला. हा सर्व प्रकार होत असताना त्यांना शासकीय यंत्रणेने का रोखले नाही, हा सर्व प्रकार कोणाच्या सहकार्याने व आशीर्वादाने झाला. या सर्व प्रकरणांमध्ये कोणाकोणाचा सहभाग आहे, याविषयी अत्यंत सुरस कथा ऐकावयास मिळतात.