शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

१ लाख २० हजार भूधारकांनाही भरपाई

By admin | Updated: March 18, 2015 00:20 IST

बीड: गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने फटका दिल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने दोन हेक्टरपेक्

बीड: गत आठवड्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने फटका दिल्याने रब्बी हंगामातील पिकांचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने दोन हेक्टरपेक्षा अधिक जमिन असणाऱ्या शेतकऱ्यांना आता एक हेक्टर मर्यादेपर्यंत मदत मिळणार असल्याचे प्रशासनाने जाहिर केले आहे.मध्यंतरी रबीच्या पिकांना अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्यामुळे ज्वारी, गहू, हरभरा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. प्राथमिक स्वरूपात अल्पभूधारक शेतकऱ्यांच्याच पिकाचे पंचानामे करून अहवाल मागविण्यात आला होता.मात्र अवकाळीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे भुधारक शेतकऱ्यांनाही एक हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रातील नुकसान भरपाई मिळणार आहे. जिल्ह्यात ६ लाख ५१ हजार ७८३ शेतकऱ्यांची संख्या आहे. यामध्ये ५ लाख ९३६ अल्पभुधारक तर १ लाख २० हजार ८४७ शेतकरी भुधारक आहेत. जिल्ह्यातील १ लाख २० हजार ८४७ भुधारक शेतकऱ्यांच्या पिकांचेही पंचनामे करण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आठ दिवसात प्रशासनाला सर्वकश माहिती देण्यात येणार आहे.पंधरा दिवसांत दोन वेळा झालेल्या अवकाळीमुळे वाढीला लागलेली पिके बाधित झाली आहेत. प्रारंभी जवळपास ६५ कोटी रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसणार असे ग्राह्य धरण्यात आले होते. पंचनामे केल्यानंतर एकंदरीत किती नुकसान झाले आहे याची माहिती समोर येईल. (प्रतिनिधी)