छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 11:42 IST2025-11-19T11:39:59+5:302025-11-19T11:42:16+5:30

मुख्यमंत्री: शेंद्रा ते बिडकीन औद्योगिक वसाहत सहा पदरी मार्गाने होणार कनेक्ट

Repair Chhatrapati Sambhajinagar to Ahilyanagar road immediately; Chief Minister's instructions | छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर:छत्रपती संभाजीनगर ते अहिल्यानगर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठकीत दिले.जिल्ह्यातील शेंद्रा औद्योगिक वसाहत ते बिडकीन औद्योगिक वसाहत आणि बिडकीन ते ढोरेगाव (छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्ग) सहा पदरी रस्ते निर्मितीला मंगळवारी पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. यासोबतच नवीन ग्रीनफिल्ड रस्ता छत्रपती संभाजीनगर ते जालना, डीएमआयसी नोड क्रमांक एक करमाड ते बिडकीन मार्गे समृद्धी महामार्गास सहा पदरी रस्ता जोडणी या नवीन आखणीस तत्वतः मान्यता दिली. पुणे ते शिरूर राष्ट्रीय महामार्गावरील ५३.४ किलोमीटर अंतरातील चार पदरी जमिनीला समांतर (ॲटग्रेड) व सहा पदरी महामार्गाच्या कामाचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.

लोकमत मागील काही महिन्यांपासून संभाजीनगर ते पुणे या विद्यमान रस्त्याच्या दुरूस्तीसाठी वारंवार वृत्त प्रकाशित करून शासनाचे लक्ष वेधत आहे. मुख्यमंत्र्यांनी पायाभुत सुविधा समितीच्या बैठकीत मंगळवारी प्राधान्याने त्या रस्त्याच्या दुरुस्तीचे तातडीने आदेश दिले.

बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, मुख्य सचिव राजेश कुमार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव ओ. पी गुप्ता, प्रधान सचिव सुवर्णा केवले, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या महत्त्वाच्या सुचना....
१. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेंद्रा (करमाड) ते बिडकीन या ३२.८ किलोमीटर लांबी, बिडकीन ते ढोरेगाव या २६ किलोमीटर लांबीच्या सहा पदरी रस्ता निर्मितीच्या कामासाठी आवश्यक जमिनीचे भूसंपादन तातडीने सुरू करा.
२. पुणे ते शिरूर या महामार्गावरील सहा पदरी उन्नत मार्ग आणि चार पदरी जमिनीच्या समतल (ॲटग्रेड) मार्गाचे काम तीन वर्षात पूर्ण करावे. पुणे ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर पुणे ते शिरूर दरम्यान औद्योगिक वसाहती असल्याने वाहनांची वर्दळ आणि भविष्यातील वाढणारी वाहनांची संख्या लक्षात घेता महामार्गाचे काम तात्काळ सुरू करा.
३. पुणे ते शिरूर महामार्गावर ३५ किलोमीटर महामार्गापैकी ७.४० किलोमीटर लांबीमध्ये जमिनीला समांतर रस्ता, त्यावर रस्ता व वर मेट्रो अशा व्हाया डक्टची निर्मिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास मंडळ यांनी समन्वयाने करावी.

Web Title : छत्रपति संभाजीनगर-अहिल्यानगर सड़क की तत्काल मरम्मत करें: मुख्यमंत्री का आदेश

Web Summary : मुख्यमंत्री ने छत्रपति संभाजीनगर-अहिल्यानगर सड़क की तत्काल मरम्मत का आदेश दिया। बुनियादी ढांचा समिति ने सड़क परियोजनाओं को मंजूरी दी, जिसमें औरंगाबाद-जालना ग्रीनफील्ड मार्ग और छह लेन शिंदखेड़ राजा-औरंगाबाद सड़क शामिल हैं। पुणे-शिरूर राजमार्ग उन्नयन की समीक्षा की गई, जिसका लक्ष्य तीन वर्षों में पूरा करना है।

Web Title : Repair Chhatrapati Sambhajinagar-Ahilyanagar Road Immediately: Chief Minister's Orders

Web Summary : CM ordered urgent repairs to Chhatrapati Sambhajinagar-Ahilyanagar road. Infrastructure committee approved road projects including Aurangabad-Jalna greenfield route and six-lane Shindkhed Raja-Aurangabad road. Pune-Shirur highway upgrade reviewed, aiming for completion in three years.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.