शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

घनसावंगीतील सिंचनाचा अनुशेष झाला दूर

By admin | Updated: September 28, 2014 00:41 IST

अंबड : गोदावरी नदी म्हणजे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाला लाभलेले दैवी वरदान आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी जास्तीस जास्त शेतजमीन सिंचनाखाली यावी

अंबड : गोदावरी नदी म्हणजे घनसावंगी विधानसभा मतदारसंघाला लाभलेले दैवी वरदान आहे. मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या विकासासाठी जास्तीस जास्त शेतजमीन सिंचनाखाली यावी हा दृष्टीकोनसमोर ठेवून पालकमंत्री राजेश टोपे यांनी सिंचनाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याचा दावा, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनी केला.मतदारसंघाच्या विकासासाठी पालकमंत्री टोपे यांच्या प्रयत्नातून घनसावंगी या एकाच मतदारसंघात ४ बॅरेजेस व २ कोल्हापुरी बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले आहे. जमिनीवर पडलेल्या पावसाचा थेंब ना थेंब अडवून दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी टोपे यांनी स्थानिक स्तर, कृषी विभाग, एमकेसीएल आदी विभागातंर्गत मतदारसंघातील बहुतांश कोल्हापुरी बंधारे व साखळी बंधारे मंजुर करुन घेतले. यातील काही बंधाऱ्यांचे काम पुर्ण झाले असुन काहींचे काम प्रगतीपथावर असल्याचे ते म्हणाले. जमिनीतील पाणी पातळीत वाढ होऊन कायमस्वरुपी पाणी टंचाई दुर होईल, असे नमूद केले. सर्वात महत्वाचे जलस्त्रोत म्हणजे गोदावरी नदी व जायकवाडी धरणाचे पाणी होय. पालकमंत्री टोपे यांनी गोदावरी नदीवर २००४ ते २००९ या कालखंडात सुरु केलेले बॅरेजेसचे काम त्यांनी २००९ ते २०१४ या कार्यकाळात पुर्ण करुन मतदारांना दिलेला शब्द खरा केला, असेही ते म्हणाले. घनसावंगीत चार बॅरेजेसचे काम पुर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे तब्बल ४ हजार ८३५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली आहे. जोगलादेवी उच्च पातळी बॅरेजेसची पाणी साठवण क्षमता १० दसलक्ष घनमीटर आहे. त्यामुळे जोगलादेवी, साडेगाव, गंगाचिंचोली, कोठाळा खुर्द, हसनापुर, गोंदी, पाथरवाला बु. या क्षेत्रातील तब्बल ५७० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आली. (प्रतिनिधी)मंगरुळ निम्न प्रकल्पाने २५ दसलक्ष घनमीटर पाणीसाठा व जवळपास १ हजार ८४० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली, राजाटाकळीमुळे २५ दसलक्ष घनमीटर पाणीसाठा, १ हजार ८२५ हेक्टर शेतजमीन ओलिताखाली, लोणीसावंगीमुळे ६०० हेक्टर शेतजमीन ओलिताखाली आल्याचे देशमुख म्हणाले.स्थानिक स्तर, कृषी विभाग, एमकेसीएल आदी विभागाच्या माध्यमातून आपण ५० गावांमध्ये २६ कोटी ९१ लाख ६७ हजार रुपयांचे कोल्हापुरी बधांरे व साखळी बंधाऱ्यांची कामे तडीस नेली. भविष्यातसुध्दा उर्वरित क्षेत्र ओलिताखाली यावे म्हणून प्रयत्न करणार आहोत, असे पालकमंत्री टोपे यांनी म्हटले.