शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गुंठेवारीतील मालमत्ता नियमित होणार;शहरातील ५ लाख नागरिकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 13:32 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुभाष देसाई आणि खात्यांच्या सचिवांसमोर मनपाचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुंठेवारी वसाहतीबाबतचा प्रस्ताव ठेवला होता.

ठळक मुद्दे२००८ सालच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिला होता प्रस्ताव२०२१ ला मंत्रिमंडळ बैठकीत नगररचना कायद्याचा आधार घेत अधिनियमात सुधारणा.

औरंगाबाद : शहरातील गुंठेवारी वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांना शासनाने बुधवारी मोठा दिलासा दिला आहे. गुंठेवारी विकास अधिनियम २००१ ची व्याप्ती वाढवून ती ३१ डिसेंबर २०२० करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री सुभाष देसाई आणि खात्यांच्या सचिवांसमोर मनपाचे प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी ३० डिसेंबर २०२० रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गुंठेवारी वसाहतीबाबतचा प्रस्ताव ठेवला होता. त्या प्रस्तावावर शासनाने शिक्कामोर्तब केले आहे. या प्रस्तावात एमआरटीपी अ‍ॅक्टमधील तरतुदींचा आधार घेण्यात आला असून, एफएसआय वापर, प्रशमन शुल्क, विकासशुल्क, प्रीमियम आकारणीचा विचार करण्यात आला आहे. मूळ प्रस्ताव महापालिका नगररचना विभागाचा असला, तरी त्याला प्रभारी आयुक्त चव्हाण यांनी गती देत महसूल अधिनियम आणि नगररचना कायद्याच्या चौकटीत तो प्रस्ताव बसविला.

शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला ११८ वसाहतींमधील सुमारे सव्वा लाख घरांना नियमित करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. महापालिका हद्दीतील अनधिकृतपणे विकसित झालेली गुंठेवारीतील घरे नियमित करण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. या निर्णयामुळे ३१ डिसेंबर २०२० पर्यंत बांधलेली गुंठेवारीतील सुमारे सव्वा लाख घरे नियमित होण्याचा दावा करण्यात येत आहे.

२००८ सालच्या मंत्रिमंडळ बैठकीत दिला होता प्रस्ताव२००८ साली स्व. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या उपस्थितीत मराठवाड्याच्या अनुशेष अनुषंगाने मंत्रिमंडळाची बैठक औरंगाबादेत झाली होती. या बैठकीत तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री तथा ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी गुंठेवारी वसाहतींसाठी एका अभ्यासपूर्ण प्रस्तावात नागरी सुविधांबाबतची वस्तुस्थिती मांडली होती. त्या प्रस्तावावरून २००१ च्या कायद्यात सुधारणा करून लोकप्रतिनिधींना स्थानिक विकासनिधी गुंठेवारी वसाहतीत खर्च करण्याची अनुमती शासनाने दिली होती.

गुंठेवारी वसाहतीच्या नियमितीकरणाचा प्रवास असा :- १९९९ पासून गुंठेवारी वसाहतींच्या अडचणी समोर येण्यास सुरुवात- २००१ ला गुंठेवारी अधिनियम आणला.- २००२ ला मनपाने ठराव घेऊन शासनाला पाठविला.- २००५ ला वसाहतींचा टोटल स्टेशन सर्व्हे करण्यात आला.- २००५ ला मालकीहक्काच्या पुराव्यांसाठी सवलत मिळाली.- २००८ ला मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रस्ताव ठेवण्यात आला.- २०१५ ला मनपा निवडणुकीच्या तोंडावर नियमितीकरणात सुधारणा- २०२० ला मूळ कायद्याची व्याप्ती वाढविण्याचा कायदेशीर प्रस्ताव.- २०२१ ला मंत्रिमंडळ बैठकीत नगररचना कायद्याचा आधार घेत अधिनियमात सुधारणा.

गुंठेवारी एक दृष्टिक्षेप असा :- ११८ वसाहती होत्या.- ५४ वसाहती नवीन झाल्याचा अंदाज- १ लाख २५ हजारांहून अधिक घरे- ५ लाखांच्या लोकसंख्येचे वास्तव्य

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHomeसुंदर गृहनियोजनState Governmentराज्य सरकारAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका