शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
3
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
4
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
5
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
6
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
7
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
8
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
9
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
10
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
11
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
12
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
13
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
14
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
15
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
17
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
18
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
19
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
20
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात रिपरिप

By admin | Updated: September 8, 2014 00:05 IST

परभणी: दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून रविवारी जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.

परभणी: दोन-तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाचे पुनरागमन झाले असून रविवारी जिल्हाभरात पावसाने हजेरी लावली. दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही.यावर्षी पावसाने मोठा ताण दिल्यामुळे जिल्ह्यावर दुष्काळाचे संकट ओढवले आहे. परंतु, आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली होती. १५ दिवस कमी-अधिक प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला होता. त्यानंतर मध्यंतरीचे दोन-तीन दिवस पावसाने विश्रांती घेतली. शनिवारी रात्री पावसाचे पुनरागमन झाले. रविवारी सकाळपासूनच शहर व परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारी १ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. रिमझिम स्वरुपाचा हा पाऊस रात्री ८ वाजेपर्यंत सुरु होता. मध्यम आणि रिमझिम पावसाची बरसात शहर व परिसरात होत राहिली. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. परभणी शहरासह जिल्हाभरात हा पाऊस आहे. पूर्णा शहर व परिसरात दुपारपासूनच पाऊस सुरु होता. जवळपास १० तास रिमझिम पाऊस झाला. आजच्या पावसामुळे पूर्णा व थुना या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. पूर्णा नदी दुथडी भरुन वाहत आहे. पाथरी, गंगाखेड, जिंतूर, पालम, सेलू या भागातही रविवारी दिवसभर रिमझिम पाऊस सुरु होता. मानवत येथे मात्र दुपारच्या सुमारास पावसाचा एक सडाका झाला. त्यानंतर पाऊस झाला नाही. (प्रतिनिधी)येलदरी आणि परिसरात रविवारी सकाळी १० वाजेपासूनच भीजपावसाला सुरुवात झाली. दुपारनंतर या पावसाने चांगलाच जोर धरला होता. सायंकाळपर्यंत पाऊस सुरुच होता. दरम्यान, या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीवात वाढ झाली आहे. ४६ टक्के पाणीसाठा धरणात उपलब्ध झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस नसला तरी परिसरात पडणाऱ्या जोरदार पावसामुळेच पाणीसाठ्यात वाढ होत आहे. दोन महिन्यांहून अधिक काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पावसाळ्याच्या उत्तरर्धात जोरदार हजेरी लावल्यामुळे बॅकलॉग भरुन काढण्याचे काम होत आहे. येलदरी धरणाची पाणीसाठवण क्षमता ९३४ दलघमी आहे. त्यात उपयुक्त पाणीसाठा ३७२ दलघमी म्हणजे ४५.५० टक्के एवढा झाला आहे. भीजस्वरुपाचा हा पाऊस फायद्याचा ठरणार आहे.