शहरं
Join us  
Trending Stories
1
ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट... पनवेल, नवी मुंबई, रायगडात पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ
2
Latest Marathi News LIVE Updates: मध्य रेल्वेची सेवा आजही विस्कळीत, डोंबिवली स्थानकावर प्रचंड गर्दी; चाकरमान्यांचे हाल
3
ट्रम्प आता पाकिस्तानचेही ऐकेनात, इराणला दिली उघड धमकी; म्हणाले, “करार होत नाही तोपर्यंत...”
4
Raigad Crime: तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात विवस्त्र अवस्थेत सापडला मृतदेह; लॉजमध्ये हत्या करून आरोपी फरार
5
धडधड वाढली, युद्ध पुन्हा पेटणार? नेतन्याहू म्हणाले, "इराणमधील आमचे मिशन अजून बाकी आहे"; ट्रम्प यांचीही धमकी
6
“जिथे कोणी जात नाही तिथे मी जातो”; DCM शिंदेंचा दुर्गम भागापर्यंत विकास पोहोचवायचा निर्धार
7
IPL 2026: अवघ्या ३० रूपयांनी बदललं Ashwani Kumarचं नशीब; ४ बळी घेत Mumbai Indiansला जिंकवलं!
8
आजचे राशी भविष्य: २१ एप्रिल २०२६: हाती घेतलेली कामे पूर्ण होतील, 'या' राशींना धनलाभाचा योग
9
“महिला आरक्षणावरील चर्चेसाठी CM फडणवीसांनी PM मोदींनाही आणावे”; प्रणिती शिंदेंचे प्रतिआव्हान
10
Supreme Court: फक्त उच्च शिक्षण पुरेसे नाही, सरकारी नोकरीसाठी सर्वोच्च न्यायालयाने घातली अट!
11
शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींची भरभराट, नवीन नोकरीची संधी; उत्पन्नात वाढ, पण बजेट सांभाळा!
12
Learning License: लर्निंग लायसन्स प्रक्रिया पुन्हा 'ऑफलाईन'; गैरप्रकार रोखण्यासाठी आरटीओचे पाऊल
13
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
14
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
15
Ashwini Paul: पार्टनरला भेटायला गेली अन् बनली ड्रग्ज सप्लायर, कोण आहे अश्विनी पॉल?
16
नेस्को ड्रग्ज प्रकरण: अनेक ड्रग्ज पेडलर्स, कॉन्सर्टमध्ये ‘विदाउट तिकीट’!
17
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
18
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
19
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
20
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
Daily Top 2Weekly Top 5

मोंढा नाक्यावरील वाहतूक कोंडी लवकर कमी करा

By admin | Updated: September 13, 2014 00:44 IST

औरंगाबाद : सध्या जालना रोडवर सुरू असलेल्या तीन उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़

औरंगाबाद : सध्या जालना रोडवर सुरू असलेल्या तीन उड्डाणपुलांच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ त्यामुळे मोंढा नाका चौकात तासन्तास वाहतूक खोळंबत असल्याने शहरवासीय त्रस्त झाले आहेत़ यासंदर्भात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांच्या पुढाकाराने विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी सकाळी ११ वा़ बैठक घेण्यात आली़मोंढा नाका चौकातील उड्डाणपुलाचे काम गतीने करून वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महत्त्वपूर्ण सूचना बैठकीत करण्यात आल्या़ यावेळी विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल, जिल्हाधिकारी विक्रमकुमार, मनपा आयुक्त प्रकाश महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती़ बैठकीत राजेंद्र दर्डा यांनी मोंढा नाका सिग्नलवर वाहतूक तासन्तास खोळंबत असल्याचे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले़ तसेच महत्त्वपूर्ण उपाय सुचवले़ ते म्हणाले की, बांधकामाची गती वाढली पाहिजे, रात्रपाळीत काम केल्यास ते शक्य आहे़ कामाची जागा कमी करून रोडवर लावलेले पत्रे आत घ्यावेत जेणेकरून वाहतुकीसाठी जास्त जागा उपलब्ध होईल, रोडवर ट्रक तसेच इतर वाहने थांबू देऊ नयेत, असेही त्यांनी नमूद केले़ जालना रोडवरील ताण कमी व्हावा यासाठी स्मशान मारुतीकडे जाणारा रस्ता दुरुस्त करण्याची सूचना यावेळी राजेंद्र दर्डा यांनी केली़ वाहतूक पोलिसांनी लाऊडस्पीकरवरून वाहनधारकांना सूचना दिल्यास मोंढा नाक्यावरील वाहतूक सुरळीत होऊ शकते, असेही त्यांनी सूचित केले़विभागीय आयुक्त संजीव जैस्वाल यांनी पैठण रोड - वाळूज लिंक रोडवरील खड्ड्े बुजविण्याचे काम त्वरित सुरू करण्याचे आदेश मनपा व सा़बा़ं विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले़ मोंढा नाक्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दुपारी ट्रक व अवजड वाहनांना जालना रोडवरून येण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी सूचना जैस्वाल यांनी वाहतूक पोलिसांना दिली़ सिडको - बसस्टँड ते एपीआय कॉर्नर येथील उड्डाणपुलाचे काम चांगल्या प्रकारे होत असल्याचे सांगत राजेंद्र दर्डा यांनी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या विद्युत डीपींकडे सर्वांचे लक्ष वेधले़ या डीपींमुळे अपघात होऊ शकतात़ त्यामुळे डीपी त्वरित हलविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना क़ेली़ त्यासोबतच वाळूज ते पैठण रोडवरील लिंक रोडमुळे होणाऱ्या वाहतुकीच्या समस्येसंदर्भात त्यांनी महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या़ स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला़ डेंग्यूची साथ आटोक्यात आणण्यासाठी महानगरपालिकेकडून तातडीने पावले उचलण्यात यायला हवीत, असे राजेंद्र दर्डा म्हणाले़ डेंग्यूची लागण होऊ नये यासाठी योग्य त्या उपाययोजना करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले़बैठकीला पोलीस उपायुक्त वसंत परदेशी, प्रादेशिक परिवहन अधिकारी सैंदाणे, वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे, सा़बां़चे कार्यकारी अभियंता एम़एम़ सिद्दीकी, सा़बां़ विभागाचे अधीक्षक अभियंता आहिरे, मनपा शहर अभियंता सखाराम पानझडे आदींसह मनपा रस्ते विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन, पोलीस आदी संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते़