शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

फिर्यादीची माहिती करणार रेकॉर्डिंग

By admin | Updated: June 22, 2015 00:21 IST

शिरीष शिंदे , बीड प्रत्येक ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीला कंट्रोल रुममधून फोन लावून ठाणे अंमलदाराच्या वर्तणूकीसह इतर माहिती गेल्या महिन्याभरापासून घेतली जात आहे.

शिरीष शिंदे , बीडप्रत्येक ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीला कंट्रोल रुममधून फोन लावून ठाणे अंमलदाराच्या वर्तणूकीसह इतर माहिती गेल्या महिन्याभरापासून घेतली जात आहे. मात्र प्रत्येक ठाण्यातून फिर्यादीला वर्तनूक चांगली मिळत असल्याचा शेरा दिला जात आहे. ही बाब पोलीस अधीक्षकांना संशयास्पद वाटली. त्यामुळे आता संभाषण रेकॉर्डींगची सुविधा उपलब्ध असणारा मोबाईल कंट्रोलरुम मध्ये दिला जाणार आहे. विश्वास नागरे पाटील यांनी औरंगाबाद परिक्षेत्र पोलीस महानिरिक्षक पदाचा पदभार स्विकारल्यानंतर त्यांनी पोलीस प्रशासनातील पारदर्शकता वाढविण्यासाठी विविध उपाय योजना कार्यान्वीत केल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक ठाण्यात गुन्हा दाखल करणाऱ्या फिर्यादीला कंट्रोल रुममधुन फोन लावुन ठाणे अंमलदाराच्या वर्तनुकीसह फिर्यादीची प्रत मिळाली आहे की नाही याची माहिती घेतली जाण्याच्या सुचना दिल्या आहेत. हा प्रयोग मराठवाड्यातील प्रत्येक अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुममार्फत राबविला जात आहे.कोणत्याही पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर एफआयआरची प्रत अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये दाखल केली जाते. कंट्रोल रुममधील पोलीस अधिकाऱ्यांमार्फत फिर्यादीशी संर्पक साधुन माहिती घेतली जात आहे. फिर्यादीचे नाव, गाव पत्ता, फिर्यादीची प्रत मिळाली का ?, पोलिसांनी चांगली वागणूक दिली का ?, आदी माहिती रजिस्टरवर नोंदवली जात आहे.महिन्यारात फिर्यादीकडून घेतलेली माहिती समाधानकारक असून चांगली वर्तनुक मिळत आहे या आशयाची नोंद केली गेली. हा प्रकार अधीक्षक अनिल पारसकर यांना संशयास्पद वाटला. त्यामुळे कंट्रोल रुममधील फिर्यादीकडून माहिती घेणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना रेकॉर्डींगची सुविधा उपलब्ध असणारा मोबाईल दिला जाणार आहे.अधीक्षक पारसकर किंवा उपविभागीय अधिकारी रेकॉर्डींग केलेल्या कॉलची कधीही तपासणी करतील. रजिस्टरवर असणारा चांगला असणारा शेरा व फिर्यार्दी सोबत झालेले संभाषण ऐकले जाईल. खोटी माहिती नोंद केल्यास संबंधीत पोलीस कर्मचाऱ्यावर कारवाई होईल अशी माहिती प्राप्त झाली आहे.