शहरं
Join us  
Trending Stories
1
सुवेंदू अधिकारी यांच्या पीएची हत्या कशी झाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला हल्ल्याचा संपूर्ण थरार!
2
होर्मुझ उघडा, करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बहल्ले; डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
3
आजचे राशीभविष्य ७ मे २०२६: कामाचा व्याप वाढेल, आज शक्यतो नवीन काम सुरू करू नका
4
भोंदू खरातविराेधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र; कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले
5
SRH vs PBKS : "चुकलो तिथेच फसलो! आता..." पराभवाच्या हॅटट्रिकनंतर ‘सरपंच’ श्रेयस अय्यर स्पष्टच बोलला
6
शेवटच्या वेतनाची ५० टक्के रक्कम पेन्शनपोटी मिळणार; सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना लागू; महागाई भत्ताही साेबत मिळणार
7
संस्थात्मक स्तरावरील फेऱ्यांतून ‘वैद्यकीय’चे प्रवेश बंद? खासगी कॉलेजांमध्ये कॅप फेऱ्यांतूनच ‘प्रवेश’चा प्रस्ताव
8
मुंबई तापणार; तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात गारपीट; जाणून घ्या अपडेट
9
या विकृतीचे करायचे काय?; पुण्यात नातीवरच अत्याचाराचा केला प्रयत्न
10
‘बर्ड फ्ल्यू’मुळे नवापुरातील कोट्यवधींची उलाढाल अचानक ठप्प; हजाराे कामगारांवर उपामारीची वेळ
11
कर्नाळा अभयारण्याजवळून जाणार महामुंबईच्या विकासाचा महामार्ग; केंद्राच्या परिवेश समितीची मंजुरी
12
एकदा घरी फोन करा ना... आई, मला घरी न्यायला ये ना…मनोरुग्णालयातील ‘त्या’ व्यक्ती स्नेहाच्या प्रतीक्षेत
13
शिक्षणाचा हक्क की केवळ कागदी घोडे? ‘आरटीई’ची २,५०० कोटी रुपये थकल्याने शाळा अडचणीत; काय आहे नेमकं प्रकरण?
14
बंगाल : भाजप सरकारचा ९ मे रोजी शपथविधी; तामिळनाडूमध्ये विजय यांना काँग्रेसने दिला पाठिंबा
15
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
16
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
17
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
18
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
19
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
20
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन महिन्यांत ३११ तक्रारी प्राप्त

By admin | Updated: May 20, 2014 01:13 IST

उस्मानाबाद : सर्वसामान्यांसाठी हितावह मानल्या जाणार्‍या अन्न सुरक्षा योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे.

 उस्मानाबाद : सर्वसामान्यांसाठी हितावह मानल्या जाणार्‍या अन्न सुरक्षा योजनेस जिल्ह्यात प्रारंभ झाला आहे. या योजनेसंदर्भात नागरिकांच्या असलेल्या तक्रारी दूर करण्याच्या उद्देशाने प्रशासनाच्या वतीने पुरवठा विभागात जिल्हा तक्रारण निवारण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या समितीकडे गेल्या साडेतीन महिन्यांत तब्बल ३११ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यापैकी १७० तक्रारीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे. केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा विधेयक ५ जुलै २०१३ पासून लागू केले आहे. तर जिल्ह्यातील १ फेब्रुवारी २०१४ पासून या योजनेची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. योजनेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने लाभार्थी निवडीची प्रक्रिया हाती घेतली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रति व्यक्ती पाच किलो गॅ्रम धान्य मिळणार आहे. यामध्ये तीन रुपये किलो तांदूळ, दोन रुपये किलो गहू असे विविध धान्य मिळत आहेत.या शिवाय अन्य सवलती दिल्या जात आहेत. या योजनेबाबत नागरिकांच्या तक्रारी दूर करण्यासाठी जिल्हा तक्रार निवारण अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत वितरित होणार्‍या अन्नधान्याबाबत किंवा इतर तक्रारींचे निवारण करण्यासाठी ही समिती कार्यरत आहे. अन्न सुरक्षा विधेयक सुरु झाल्यापासून जिल्ह्यात ३११ तक्रारी या समितीकडे दाखल झाल्या आहेत. त्यापैैकी १८१ तक्रारीची तपासणी करण्यात येऊन १७० तक्रारीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली तर १४१ तक्रारी शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)