शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
5
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
6
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
7
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
12
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
13
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
14
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
15
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
16
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
17
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
18
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
19
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
20
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला वेग

By admin | Updated: August 9, 2015 00:30 IST

रत्नागिरी ते नागपूर या लातूरमार्गे जाणाऱ्या बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने

दत्ता थोरे , लातूररत्नागिरी ते नागपूर या लातूरमार्गे जाणाऱ्या बहुचर्चित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ च्या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने या महामार्गाच्या कामाची ‘थ्री स्मॉल ए’ ची अधिसूचना काढली असून सक्षम प्राधिकारीपदी उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय २०१४ ला ‘टू लेन’ घोषित झालेला हा मार्ग आता नव्या अधिसूचनेनुसार ‘फोर लेन’ करण्यात आला आहे. लातूर जिल्ह्यातून रत्नागिरी ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावित होता. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून या कामाच्या फक्त चर्चाच व्हायच्या. मुहूर्तच लागत नसलेल्या या कामाला या जूनपासून वेग आला आहे. नितीन गडकरी यांच्या अखत्यारीत असलेल्या या खात्यातून हे काम होणार असून या मार्गाच्या भूसंपादनासाठी ‘थ्री स्मॉल ए’ ची अधिसूचना जूनच्या राजपत्रात प्रकाशित करण्यात आली आहे.लातूर जिल्ह्यातून जेवढा मार्ग जातो, तेवढ्या मार्गासाठी जमीनीचे भूसंपादन करावयासाठी खास अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत़ एसडीसो शोभा जाधव यांच्याकडे याच्या सक्षम प्राधिकारीपदाची सूत्रे देण्यात आली आहेत. सक्षम प्राधिकारीच्या नियुक्तीनंतर ते आता उस्मानाबाद-लातूरच्या सिमेवरील उजनीपासून ते लातूर-नांदेडच्या सीमेवरील रूईपर्यंतच्या जिल्ह्याच्या हद्दीतील किती जमीन लागेल याचा अभ्यास करणार आहे. या मार्गातील येणाऱ्या लातूर जिल्ह्यातील ८५ गावातील आवश्यक जमिनीची संयुक्त मोजणी करुन घेतील. शेती किती जाते ? जागा किती लागते ? फळपिके किती आहेत ? घरे किती आहेत ? त्यांच्या किमतीसह मावेजा ठरविण्यात येणार आहे. अंदाजे या वर्षभरात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लातूर जिल्ह्यातील उजनीपासून त्यांना एक वर्षात या महामार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश मिळाले आहेत. त्यानुसार आम्ही आता नेमकी किती गावे येणार आहेत ? रस्त्यासाठी किती जमीन लागणार आहे ? किती शेतकरी आहेत ? त्यांना किती मावेजा द्यावा लागणार आहे ? याची माहिती संकलित करीत आहोत. पूर्ण माहिती संकलित झाल्यानंतर ती केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणकडे पाठविण्यात येईल. त्यानुसार मावेजाचे आदेश निघून त्याचे भूसंपादन करण्यात येईल, असे उपविभागीय अधिकारी शोभा जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. राष्ट्रीय महामार्गासाठी निघणाऱ्या भूसंपादनाच्या अधिसूचना या ‘थ्री स्मॉल ए’, ‘थ्री कॅपिटल ए’, ‘थ्री डी’ आणि ‘अवॉर्ड’ अशा चार टप्प्यात केल्या जातात. ‘थ्री स्मॉल ए’मध्ये सक्षम प्राधिकारी नियुक्त केला जातो. ‘थ्री कॅपिटल ए’ मध्ये ज्या सर्व्हे नंबरचे भूखंड ताब्यात घ्यावयाचे आहेत त्याचे नंबर घेऊन ते शासनाला कळविले जातात. ही अधिसूचना आता निघायच्या मार्गावर आहे. त्यानंतर ‘थ्रीडी’ मध्ये सर्व्हे नंबरच्या व्यक्तींची नावे घोषित केली जातात आणि ‘अवॉर्ड’ या शेवटच्या टप्प्यात बाधितांना मावेजा दिला जातो. २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये मावेजा मिळणार आहे़राष्ट्रीय महामार्ग ३६१ हा जरी रत्नागिरी ते नागपूर असला तरी सोलापूरपर्यंत एन. एच. ९ हा फोर लेन रस्ता आला आहे. २११ क्रमांकाचा सोलापूर ते धुळे या महामार्गाच्या फोर लेनचे काम सुरु आहे. आता फक्त तुळजापूर ते नागपूर या मार्गावरच फोर लेनचे काम करावे लागणार आहे.