शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
9
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
10
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
11
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
12
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
13
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
14
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
15
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
16
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
17
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
18
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
19
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
20
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
Daily Top 2Weekly Top 5

रेशनिंग पारदर्शकता २८ दुकानांपुरतीच

By admin | Updated: November 25, 2014 01:00 IST

सुनील कच्छवे , औरंगाबाद रेशन दुकानांवरील अन्नधान्याचा आणि साखरेचा काळाबाजार थांबवून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षापूर्वी गाजावाजा करून

सुनील कच्छवे , औरंगाबादरेशन दुकानांवरील अन्नधान्याचा आणि साखरेचा काळाबाजार थांबवून त्यात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षापूर्वी गाजावाजा करून बायोमेट्रिक पद्धत आणली. मात्र, आतापर्यंत फक्त २८ दुकानांवरच ही पद्धत लागू होऊ शकली आहे. जिल्ह्यातील रेशन दुकानांच्या तुलनेत ही संख्या दोन टक्क्यांपेक्षाही कमी आहे. जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी सर्व रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धत लागू करण्याची घोषणा घोषणाच ठरली आहे.औरंगाबाद जिल्ह्यात १७१७ स्वस्त धान्य दुकाने आहेत. या दुकानांवरून दरमहा लाभार्थ्यांना सवलतीच्या दरात गहू, तांदूळ, साखर तसेच केरोसीन दिले जाते. मात्र, बऱ्याच वेळा संपूर्ण कोटा उचलूनही अनेक रेशन दुकानदार लाभार्थ्यांना त्याचे वाटप करीत नाहीत आणि त्यानंतर तो कोटा बाजारभावाने विक्री करतात. त्यामुळे काळाबाजार थांबवून खऱ्या लाभार्थ्यांना अन्नधान्य आणि साखर व केरोसीन मिळावे यासाठी जिल्हा प्रशासनाने दीड वर्षापूर्वी प्रायोगिक तत्त्वावर बायोमेट्रिक पद्धत आणली. सुरुवातीला शहरातील ९ दुकानांवर ही पद्धत लागू केली गेली. या नऊ दुकानचालकांवर प्रत्येकी एक बायोमेट्रिक मशीन बसविण्यात आले, तसेच दुकानचालकांना टॅब्लेटचे वाटप केले. या टॅब्लेटमध्ये लाभार्थ्यांची सर्व माहिती, त्यांचे छायाचित्र आणि बोटांचे ठसे साठविले गेले. लाभार्थी दुकानावर आल्यानंतर आधी बायोमेट्रिक मशीनवर त्याच्या बोटाचे ठसे जुळवून मगच त्याला अन्नधान्य देण्याची तरतूद यात आहे. दुकानावरील टॅब्लेट आॅनलाईन पद्धतीने मुंबई येथील सर्व्हरला जोडण्यात आलेले आहे. त्यामुळे दिवसभरात किती लाभार्थ्यांनी धान्य नेले, कोणत्या लाभार्थ्यांनी नेले याचे रेकॉर्ड दरमिनिटाला अद्ययावत होते. परिणामी, उरलेले धान्य परत करण्याशिवाय दुकानदाराला पर्याय नाही. या पद्धतीने शहरातील नऊही दुकानांवर कधी नव्हे ते दर महिन्याला काही धान्य आणि केरोसीन शिल्लक राहिल्याचे सुरुवातीलाच आढळून आले. त्यानंतर जिल्हाधिकारी विक्रमकुमार यांनी ग्रामीण भागातील आणखी काही दुकानांवर ही पद्धत लागू केली. तसेच हळूहळू जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांवर बायोमेट्रिक पद्धत लागू केली जाईल, असे जाहीर केले होते. मात्र, आता दीड वर्ष उलटले तरी ही पद्धत २८ दुकानांपुरतीच मर्यादित राहिली आहे. जिल्ह्यातील अजूनही १६८९ दुकानांवर जुन्याच पद्धतीने धान्य वाटप सुरू आहे. ४जिल्हा पुरवठा अधिकारी संजीव जाधवर यांना याविषयी विचारले असता ते म्हणाले, सध्या २८ दुकानांवर बायोमेट्रिक पद्धतीने धान्य वाटप केले जात आहे. जिल्ह्यातील उर्वरित दुकानांवरही ही पद्धत लागू करायची आहे. ४सध्या प्रत्येक दुकानावर एक बायोमेट्रिक मशीन आणि एक टॅब्लेट दिलेले आहे. हे दोन्ही एकमेकांना जोडावे लागतात. मात्र, लवकरच टॅब्लेटमध्येच बायोमेट्रिक असलेले मशीन येणार आहे. हे मशीन आले की सर्वत्र त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे.