शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

फाटाफुटीने वाढले ३५ उमेदवार

By admin | Updated: October 3, 2014 23:53 IST

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ उमेदवार आखाड्यात होते.

२००९ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ७४ उमेदवार आखाड्यात होते. ६ जागांसाठी हा सामना चांगलाच रंगला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस तसेच भाजप व सेना एकत्रित निवडणुका लढले होते. गतवेळी शिवसेनेने बीडची एकमेव तर काँग्रेसने परळीची एकमेव जागा लढली होती. उर्वरित ५ ठिकाणी राष्ट्रवादीविरुद्ध भाजपा अशी थेट लढाई झाली होती. यामध्ये राष्ट्रवादीने भाजपाला सुरुंग लावला होता. ६ पैकी ५ जागा पटकावत राष्ट्रवादीने जिल्ह्यात जोरदार मुसंडी मारली होती. भाजपाला परळीच्या एकमेव जागेवर समाधान मानावे लागले होते.भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव यांच्या निधनानंतर प्रथमच होत असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपची चांगलीच कसोटी लागली आहे. सलग तीन ‘टर्म’ एकत्रित संसार केलेल्या आघाडीत फाटाफूट झाल्यामुळे जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचेही समीकरण बदलून गेले.एरव्ही राष्ट्रवादीच्या उमेदवारांना ‘हात’भार लावत पडती बाजू घेणाऱ्या काँग्रेसनेही यावेळी सर्वच्या सर्व ६ ठिकाणी स्वतंत्र उमेदवार उभे केले. दुसरीकडे शिवसेनेने देखील परळी वगळता सर्व ठिकाणी आपल्या उमेदवारांना आखाड्यात उतरविले. आता मागच्या सारखी ‘स्ट्रेट फाईट’ नाही. लढती बहुरंगी आहेत.२००४ मध्ये ६ जागांसाठी ७६ उमेदवार उभे होते. २००९ मध्ये हा आकडा २ ने कमी झाला. यावेळी मात्र उमेदवारांच्या संख्येने शंभरी पार केली आहे. ६ जागांसाठी १०९ उमेदवार नशीब अजमावत आहेत. गतवर्षीपेक्षा ३५ उमेदवारांची गर्दी यावेळी वाढली आहे.६ जागांसाठी तब्बल २०७ अर्ज वैध ठरले होते. मात्र ९८ जणांनी माघार घेतली. त्यामुळे १०९ उमेदवार रिंगणात आहेत. अपक्षांनीही यंदा चांगलीच गर्दी केली आहे. गेवराईमध्ये सर्वात कमी ११ उमेदवार आहेत तर बीडमध्ये सर्वाधिक २५ उमेदवार आहेत. पाठोपाठ आष्टी येथे १२ तर माजलगावात २४ उमेदवारांमध्ये सामना रंगला आहे. मतांचे विभाजन होणार असल्यामुळे धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविली जाऊ लागली आहे. तूर्त प्रचाराला मोठा वेग आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. ठिकठिकाणी मातब्बर नेत्यांच्या सभा, बैठकांची रेलचेल सुरू आहे.लोकसभेत ‘स्ट्रेट फाईट’बीड लोकसभेसाठी होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत १२ उमेदवार आमने-सामने आहेत. मात्र खरी लढत भाजपच्या उमेदवार प्रीतम गोपीनाथ मुंडे, काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांच्यात होत आहे. अशोक पाटील यांनी यापूर्वी दोनदा लोकसभा निवडणूक लढविली. मात्र त्यांना अपयश आलेले आहे. दुसरीकडे प्रीतम मुंडे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे.