शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

मुजोर रिक्षांना आरटीओचे अभय

By admin | Updated: April 7, 2015 01:26 IST

औरंगाबाद : सतत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या १५७ अ‍ॅपे, आॅटोरिक्षांचे प्रवासी वाहतुकीचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव तीन

औरंगाबाद : सतत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या, दादागिरी करणाऱ्या १५७ अ‍ॅपे, आॅटोरिक्षांचे प्रवासी वाहतुकीचे परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव तीन महिन्यांपूर्वी वाहतूक शाखा पोलिसांनी आरटीओ कार्यालयाकडे पाठविला होता. विशेष म्हणजे त्यासाठी तीनदा स्मरणपत्रही देण्यात आले; परंतु ‘माये’पोटी आरटीओ कार्यालयाने अद्याप या रिक्षांचे परवाने निलंबित केलेले नाहीत. पोलिसांचा हा प्रस्ताव तसाच धूळखात पडून आहे. अ‍ॅपे, आॅटोरिक्षाचालकांनी गेल्या अनेक वर्षांपासून शहरात अक्षरश: उच्छाद मांडलेला आहे. क्षमतेपेक्षा तीन, चारपट अधिक प्रवासी बसविणे, जणू रस्ता केवळ आपल्यासाठीच आहे, अशा पद्धतीने रिक्षा चालविणे, प्रवासी घेण्यासाठी रस्त्यात कोठेही रिक्षा थांबवून वाहतुकीस खोळंबा निर्माण करणे, कुणी जाब विचारण्याचा प्रयत्न केला तर त्याला शिवीगाळ, मारहाण करणे, असे प्रकार शहरातील रिक्षाचालकांकडून सुरू आहेत. रिक्षाचालकांची दादागिरी इतकी वाढली आहे की ते चक्क पोलिसांनाही मारहाण करण्यास मागेपुढे पाहत नसल्याचे चार दिवसांपूर्वी जालना रोडवर घडलेल्या घटनेवरून दिसून आले.पोलिसांवर रिक्षाचालकाने केलेल्या हल्ल्यामुळे रिक्षाचालकांच्या दादागिरीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्या घटनेनंतर वाहतूक शाखा पोलिसांनी अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षांविरुद्ध मोहीम पुन्हा एकदा तीव्र केली आहे. मात्र, बेदरकार बनलेल्या रिक्षाचालकांना धडा शिकविण्यासाठी पोलिसांना आरटीओ कार्यालयाकडून तितकेसे सहकार्य मिळत नसल्याचे समोर आले आहे.