शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

रोगप्रतिकार शक्तीसाठी 'बूस्टर डोस' ठरणाऱ्या रानभाज्या बहरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 19:56 IST

अनेक जीवनसत्व असलेल्या रानभाज्या खाण्याकडे नागरिकांचा कल वाढला

ठळक मुद्देनैसर्गिकरीत्या येणाऱ्या भाज्या कीटकनाशक मुक्त आहेतरोगप्रतिकारक शक्ती वाढी सोबतच अनेक व्याधींवर गुणकारी

- श्यामकुमार पुरे

सिल्लोड: अजिंठ्याच्या डोंगरात रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या रानभाज्या बहरल्या आहेत. अनेक जीवनसत्व असलेल्या या भाज्या खाण्याकडे आता लोकांचा कल वाढला आहे. कोणतीही औषधी फवारणी न करता नैसर्गिकरित्या डोंगरात, शेताच्या बांधावर उगवलेल्या या रानभाज्यांची खेड्यापाड्यातील ग्रामस्थांना चांगलीच ओळख आहे. या भाज्यांवर ताव मारण्यासोबतच ते या नैसर्गिक देणगीचे जतन करताना ही दिसत आहेत. 

अजिंठयाच्या कुशीत पावसाळ्यात अनेक रानभाज्या सर्वत्र उगवतात. श्रावणात तर या भाज्यांना बहर येतो. अजिंठा डोंगर रांगालगतचा भाग याबाबत अधिक समृद्ध आहे. पिपळदरी, हळदा, लेनापुर, वसई या भागात मोठ्याप्रमाणावर रानभाज्या आढळतात. त्यात चिंचु, कोलार, माठ, म्हैसवेल, हत्तीकान(ब्रम्हराक्षस) भांगरा, करटूले, कोका, मुरमुट्या, गुल चांदणी, फांद, अंबाडी, कुरडू, आघाडा, तांदुळजा, बांबचे कोंब, शतावरी, राजगिरा, तरोटा, घोळ अशा जवळपास 20 प्रकारच्या रानभाज्या सहज दिसून येतात. विशेष म्हणजे या भाज्या नैसर्गिकरित्या येत असून यावर कसल्याही प्रकारची कीटकनाशक फवारणी करण्यात येत नाही. यामुळेच अत्यंत पौष्टिक असण्यासोबतच या भाज्या सकसही आहेत. 

रानभाज्या व त्याचे महत्व1) तांदुळजा :- 'क' व 'अ' जीवनसत्व विपुल असून रोगप्रतिकार शक्ती वाढीसाठी उपयुक्त. उष्णता व दाह कमी करते, मलावरोध दूर करते. 2) फांद :- ही वेल वर्गीय असून याची पाने खाद्य असतात. पित्तविकार दूर करणारी, निद्रा येण्यासाठी उपयुक्त3) अंबाडी :- 'क' व 'अ' जीवनसत्व, लोह, झिंक, कैल्शियम यात विपुल प्रमाणात असतात. गुणाने असून रोगप्रतिकार शक्ती वाढवते. ४) म्हैसवेल :- 'अ' जीवनसत्व वाढवणारी, पोटाच्या विकारात लाभदायी 5) हत्ती कान :- यास ब्रम्हराक्षस म्हणुन ही ओळखले जाते. खुप दुर्मिळ असणाऱ्या या वनस्पतिचे शास्त्रीय नाव "लिया मैक्रोफायला " असे आहे. पित्तविकार दूर करणारी, पाचकता वाढविणारी.

 

6) कोलार :- रुचकर व मल स्वछ करणारी ,मुळव्याधीसाठी लाभदायक.7) आघाडा :-  गुणाने कडू, पाचक, उष्णता कमी करणारी, मूत्रातील आम्लता कमी करणारी.8) घोळ :- थंड गुणांची, पचनास मदत करणारी. 9) चिंचु :- ही दुर्मिळ असणारी वनस्पति असून याच्या पानांची भाजी बनवतात. रुचकर, पचनास हलकी व जीवनसत्व व खनिजयुक्त आहे.10) कुरडू :-  शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करते. दमा व श्वास रोगत लाभदायी.  

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादvegetableभाज्याHealthआरोग्य