वाळूज महानगरात पावसाच्या हलक्या सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:40 IST2019-06-06T23:40:33+5:302019-06-06T23:40:51+5:30
वाळूज महानगर परिसरात गुरुवारी (दि. ६) सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ऊन व उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना रिमझिम पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. यावेळी बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.

वाळूज महानगरात पावसाच्या हलक्या सरी
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात गुरुवारी (दि. ६) सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. ऊन व उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना रिमझिम पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला. यावेळी बच्चे कंपनीने पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
गुरुवारी अचानक वातावरणात बदल होऊन हवेत गारवा निर्माण झाला होता. सकाळी ७ वाजेच्या सुमारास रिमझिम पावसाला सुरुवात झाली. परिसरातील सिडको वाळूज महानगर, बजाजनगर, पंढरपूर, तीसगाव, वडगाव कोल्हाटी, साजापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी जवळपास अर्धा तास कोसळल्या. रस्त्यावर पाणी साचून चिखल झाल्याने वाहनधारक घसरून पडले. चिखलातून ये-जा करताना वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. या वर्षीचा पहिलाच पाऊस असल्याने बच्चे कंपनीसह अनेकांनी सकाळी भिजण्याचा आनंद घेतला, तर मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या अनेकांना भिजत घर गाठावे लागले. पावसामुळे सकाळी विविध कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या नागरिकांना तसेच शिकवणीसाठी जाणाºया शाळकरी विद्यार्थ्यांना छत्रीचा आधार घ्यावा लागला. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. या पावसामुळे ऊन व उकाड्याने त्रस्त नागरिकांना काहीअंशी का होईना दिलासा मिळाला आहे.