शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बायपासच्या सर्व्हिस रोडचा प्रश्न बासणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:16 IST

परंतु जड वाहनांमुळे अद्यापही अपघाताचे प्रमाण टळलेले नाही, दोन दिवसांपूर्वीच दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाला. दररोज किरकोळ स्वरूपाच्या अपघाताच्या ...

परंतु जड वाहनांमुळे अद्यापही अपघाताचे प्रमाण टळलेले नाही, दोन दिवसांपूर्वीच दोन युवकांचा अपघातात मृत्यू झाला. दररोज किरकोळ स्वरूपाच्या अपघाताच्या घटना घडतच आहेत. पोलीस आयुक्त ते सार्वजिनक बांधकाम विभाग, मनपा, आरटीओ, जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत बैठका झाल्या आहेत. दरवेळी रस्त्याचा विषय ऐरणीवर घेण्यात आलेला आहे; परंतु त्याकडे कुणीही फारसे लक्ष दिलेले नाही.

रस्त्यावर वाहतूक नव्हे तर वाहने, दुकाने मांडणे सुरू

अतिक्रमणे पाडली, रस्ता मोकळा केला; परंतु त्यावर भाजीपाला, तसेच व्यावसायिकांच्या गाड्या पुन्हा उभ्या करण्यात येत आहेत. त्यामुळे अघोषित वाहनतळ निर्माण होत आहे. पुन्हा मनपाला अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी लागते की काय, असा सवाल दक्ष नागरिकांतून उपस्थित होत आहे. महानुभाव आश्रम ते देवळाई फाटा वाहनाच्या वर्दळीमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. त्वरित लक्ष देऊन सर्व्हिस रोडचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी असतानाही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले जात असून, प्रश्न बासणात पडला असल्याचा समज नागरिकांचा झाला आहे.

दुतर्फा वाढवून डांबरीकरण होणार...

बायपास रस्त्याच्या दुतर्फा एकेक पदरी रस्ता वाढविण्याचे काम सुरू असून, नियोजित सर्व्हिस रस्त्याविषयी वरिष्ठ निर्णय घेतील. रस्त्याचे काम जोरात सुरू असून, जनतेसाठी तो लवकरच वापरात येणार आहे. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

- सुनील कोळसे (शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग)

कॅप्शन...

अतिक्रमण काढलेल्या बायपास रस्त्यावर पुन्हा अतिक्रमणे सुरू.