शहरं
Join us  
Trending Stories
1
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
2
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
3
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
4
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
5
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट
6
‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
7
लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली
8
GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
9
Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!
10
Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
11
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
12
"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
13
Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!
14
बाळाचं नाव ठेवण्यासाठी महिला घेतले तब्बल २७ लाख! आतापर्यंत ५०० मुलांचे नामकरण! काय आहे वैशिष्ट्ये?
15
धनुष-क्रितीच्या 'तेरे इश्क मे'च्या टीझरमध्ये दिसतोय प्रेमातील विश्वासघाताचा थरार; अंगावर शहारा आणणारे दर्दी संवाद
16
PPF, KVP, SSY सारख्या लघु बचत योजनांवर आता किती मिळणार रिटर्न; सरकारचा आला निर्णय, पटापट चेक करा
17
मी आठ युद्धे थांबवली, नोबेल न मिळाल्यास..; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
18
फेरारी कार नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
19
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
20
Video - "एक, दोन रुपये तरी द्या..."; इन्फ्लुएन्सर iPhone 17 Pro Max घेण्यासाठी मागतेय डोनेशन

आंदोलकांनी अडवला राज्यपाल बागडेंचा ताफा; राज्यासह राजस्थानची पोलिस यंत्रणा अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:26 IST

पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव

छत्रपती संभाजीनगर : चिकलठाण्याकडून शहराकडे येत असताना, राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा ताफा संजयनगर, मुकुंदवाडी प्रवेशद्वारासमोर आंदोलकांनी अडवला. ही घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता घडली. अचानक घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांची प्रचंड धावपळ उडाली. तीन-चार पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलकांना पाठीमागे ढकलले. त्यानंतर, ताफा नियोजित ठिकाणी रवाना झाला. या घटनेची नोंद मुकुंदवाडी पोलिसांनी केली आहे.

महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने मुकुंदवाडी परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. नागरिकांशी संवाद साधण्यासाठी माजी खा.इम्तियाज जलील आले, तेव्हा त्यातील एकाने या रस्त्यावरून जाणाऱ्या मंत्र्यांचा ताफा अडविण्याची भाषा केली. त्याच वेळी बागडे यांचा ताफा येऊ लागला. तेव्हा एकाने रस्त्याच्या दिशेने धाव घेतली. ताफ्यातील पायलट एस्कॉर्ट गाडीतून सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी खाली उतरत आंदोलकाला रस्त्यावरून बाजूला करण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत ताफ्याचा वेग मंदावला होता. तेवढ्यात इतर नागरिक इतर वाहनांसमोर आले. ताफ्यातील पोलिस अधिकारी, कर्मचारी आले. ते आंदोलकांना हटविण्याचा प्रयत्न करीत असतानाच माजी खा.जलील आले. बागडे यांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर ताफा रवाना झाला.

पोलिस अधिकाऱ्याने हात जोडलेमहिला आंदोलकांनी राज्यपालांच्या वाहनाला घेराव घातला, तेव्हा सहायक पोलिस निरीक्षक हरेश्वर घुगे यांनी हात जोडत महिलांना बाजूला होण्याची विनंती केली. त्याच वेळी राज्यपालांच्या सुरक्षेत तैनात असलेले पाेलिस निरीक्षक अमोल देवकर यांच्यासह घटनास्थळावरील पोलिस उपनिरीक्षक सचिन वायाळ, पांडुरंग डाके, शिवाजी घोरपडे यांनीही राज्यपालांच्या वाहनाला संरक्षण देत, गाडीच्या समोरील ध्वजाचे रक्षण केले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धावही घटना समजताच, पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी पोलिस उपायुक्त प्रशांत स्वामी, सहायक पोलिस आयुक्त रणजीत पाटील, धनंजय पाटील, सुदर्शन पाटील, पोलिस निरीक्षक सचिन इंगोले, गजानन कल्याणकर, सुनीता मिसाळ, सहायक निरीक्षक विवेक जाधव यांच्यासह इतर अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

राजस्थानपर्यंतची सुरक्षा यंत्रणा अलर्ट‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा असतानाही राज्यपालांचा ताफा अडविल्याच्या घटनेमुळे राज्याच्या पोलिस यंत्रणेसह राजस्थानची पोलिस यंत्रणा अलर्ट झाली. पोलिस आयुक्तांना वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मंत्र्यांकडून विचारणा करण्यात येत होती. घटनास्थळावर मोठा फौजफाटा तैनात होता.

...अन् सर्व शांत झालेघटनास्थळावरून पोलिस आयुक्त मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गेले. राज्यपालांचा ताफा अडविणाऱ्यांच्या विरोधात विविध कलमांन्वये गुन्हे नोंदविण्याची प्रक्रिया पोलिस आयुक्तांच्याच मार्गदर्शनात सुरू करण्यात आली. वेगवेगळ्या व्हिडीओ फुटेजवरून आरोपींची ओळख पटविण्यात येत होती. जवळपास १५ लोकांची नावे निष्पन्न झाली होती. त्याच वेळी पोलिस आयुक्तांचे राज्यपाल बागडे यांच्यासोबत बोलणे झाले. तेव्हा बागडे म्हणालेे, आंदोलकांच्याही काही भावना आहेत. त्यांनी कोणत्याही प्रकारचे नुकसान केलेले नाही. त्यामुळे कडक कारवाई करू नये. या प्रकारानंतर पोलिस आयुक्त हे राज्यपाल बागडे यांना भेटण्यासाठी रवाना झाले.

असा प्रकार खपवून घेतला जाणार नाहीराज्यपाल हे पद घटनात्मक आहे. या पदावरील व्यक्तीचा सन्मान केला पाहिजे. शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात काही जण राजकारण करीत आहेत. मात्र, कोठे राजकारण करावे, हे समजायला हवे. सुरक्षेच्या बाबतीत असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. संबंधितांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येईल, तसेच अतिक्रमण हटाव मोहीम यामुळे थांबणार नाही.- प्रवीण पवार, पोलिस आयुक्त.

टॅग्स :Chhatrapati Sambhaji Maharajछत्रपती संभाजी महाराजHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेagitationआंदोलनCrime Newsगुन्हेगारी