मराठा आरक्षणाची मागणी करत झाडाला उलटे लटकून आंदोलन
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 13:24 IST2023-09-09T13:24:12+5:302023-09-09T13:24:57+5:30
मराठा समाज शांततेने आंदोलन करत आहे मात्र, आमचा अंत पाहू नका अन्यथा उद्रेक होईल

मराठा आरक्षणाची मागणी करत झाडाला उलटे लटकून आंदोलन
सिल्लोड: मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाच्यावतीने मंगरूळ फाट्यावर आज ( दि. ९ ) सकाळी १० वाजता झाडाला उलटे लटको आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावे, अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवरील गुन्हे तात्काळ रद्द करावे अशी मागणी आंदोलकांनी केली.
दरम्यान, आज आम्ही झाडाला उलटे लटकलो आहोत, मागण्या पूर्ण न झाल्यास उद्या सरकारला उलटे लटकवू असा इशारा आंदोलकांनी यावेळी दिला. तसेच मराठा समाजाकरता मागील बारा दिवसापासून उपोषणाला बसलेले जरांगे पाटील यांच्या जीवितास काही धोका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारची असेल. मराठा समाज शांततेने आंदोलन करत आहे मात्र, आमचा अंत पाहू नका अन्यथा उद्रेक होईल, असा इशारा यावेळी सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला.
आंदोलनात मारुती पाटील वराडे, प्रवीण पा. मिरकर,शिवाजी दाभाडे,प्रमोद दौड,बंटी पाटील शिंदे,अनिल बनकर,डॉ.निलेश मिरकर,डॉ.शेखर दौड,डॉ.अकाते,राजू बर्डे,आशिष गोराडे,दत्ता पाटील पांढरे,पंकज गोराडे,सोमनाथ राऊत,अक्षय पाटील मगर,सुखदेव भगत,अक्षय पाटील,वैभव तायडे,अजय कोलते,सुनील पा.पांढरे,विजय सोनवणे,मयूर क्षीरसागर,विशाल सोनवणे,निलेश काकडे, सांडू पुंगले,सचिन गव्हाणे,युवराज वराडे,रत्नाकर ढवळे,मनोज दौड,मनोज कळम,सचिन पाटील साळवे आदींचा सहभाग होता.